ब्युरो टीम: मोठी बातमी समोर येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेला सुरुवात होणार आहे.
उद्धव ठाकरे हे लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढावा घेणार असून, ते राज्यातील पाच विभागात मेळावे घेणार आहेत, अशी माहिती ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. त्या अमरावतीमध्ये बोलत होत्या.नेमकं काय म्हणाल्या अंधारे? ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा महाप्रबोधन यात्रेला सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे हे लोकसभा निहाय मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.
ऑक्टोबरमध्ये उद्धव ठाकरे राज्यातील पाच विभागांमध्ये मेळावे घेणार आहेत. अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे व कल्याण या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे मेळावे होणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे हे लोकसभेसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांचा आढावा देखील घेणार असल्याची माहिती अंधारे यांनी दिली आहे.शरद पवार, अजितदादा भेटीवर प्रतिक्रिया दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार आणि अजितदादा यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे.
पण या भेटीवेळी जयंत पाटीलही सोबत होते, त्यामुळे या भेटीमागे राजकीय रंग वाटतो. महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ नये, याची संबंधितांनी काळजी घ्यावी. मविआचा घटक म्हणून आम्ही अपेक्षा करतो की संभ्रम निर्माण होईल अशी परिस्थिती आणू नये, असं अंधारे यांनी म्हटलं आहे. त्या अमरावतीमध्ये बोलत होत्या.
टिप्पणी पोस्ट करा