Weight Loss Tips: सुटलेलं पोट कमी करायचंय ? आहारतज्ज्ञांनी सांगितला उपाय

ब्युरो टीम: वेस लॉससाठी व्यायाम किंवा डायटिंग करावी लागते. पण सगळ्यांनाच हे जमतं असं नाही. अनेकांना रोजच्या व्यस्त जीवनशैलीत व्यायामासाठी वेळ मिळत नाही. आपण बारीक सुडौल दिसावं, वजन नियंत्रणात राहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.

कमी वेळेत बारीक होण्यासाठी लोक अनेक उपाय करून पहातात. तासनतास उपाशी राहण्यापासून रात्रीचं जेवण सोडण्यापर्यंत अनेक प्रयत्न सुरू असतात तर काहीजण जीममध्ये तासनतास घाम गाळतात. 

वजन कमी करण्यासाठी अनेकजण डिटॉक्स डाएटसुद्धा घेतात. न्युट्रिशनिस्ट रमिता कौर यांनी फॅन्सी डाएट खूपच नुकसानकारक असल्याच सांगितले आहे. टॉक्सिन्स काढून टाकण्यासाठी तुम्ही ३ पदार्थ खाऊ शकता. पोटाची चरबी वाढण्यासाठी काही टॉक्सिक पदार्थ जास्त जबाबदार ठरतात. रिकाम्या पोटी जिरा पुदिन्याचं डिटॉक्स वॉटर प्या, ब्रेकफास्टमध्ये काकडी खा, दोन जेवणांच्यामध्ये चिया सिड्सचे पाणी प्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने