Yogesh Kadam: आमचा रोष अजितदादावर नव्हे तर उद्धव ठाकरेंवर ; शिवसेना आमदाराने सांगितले शिवसेनाफुटीचे मुख्य कारण मोठा

ब्युरो टीम:  दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक देखील केलं आहे.

आमची नाराजी ही कधीही अजित पवार यांच्याबद्दल नव्हती, तर आमची नाराजी ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबाबत होती असं त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात पक्ष कमकुवत झाला होता, मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या आमदारांना बळ दिलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले कदम? शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीच्या काळात आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री असतानाही पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. त्या उलट आमदारांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रत्येकाला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो, मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून तसा प्रयत्न कधीच झाला नाही. त्यामुळे आमची नाराजी ही अजित पवार यांच्याबद्दल नव्हती तर ती उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच होती, असं कदम यांनी म्हटलं आहे.

कदम यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाले त्यांचं आम्ही स्वागत करतो. आमचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. आम्हाला आता खमके नेतृत्व लाभलं आहे. यापूर्वी आमचं नेतृत्व कमकुवत होतं.

उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांना कधीही बळ दिलं नाही. मात्र आता मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना बळ देण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे पक्ष संघटनाही मजबूत होत आहे.महाविकास आघाडीच्या काळात एकीकडे राज्यातील सर्वच पक्ष आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र स्वतःचाच पक्ष कमकुवत करून ठेवला असा घणाघात योगेश कदम यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने