ब्युरो टीम: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर पत्रकार परिषदेत सुनावलं आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना भर पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला. मलाही बोलता येतं. पण अशा लोकांकडे मी लक्ष देत नाही. हे लोक म्हणजे वाचाळवीर आहेत. यांना मी एवढंच म्हणेन विनाशकाले विपरित बुद्धी!, असं म्हणत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. त्यांना आम्ही मानत नाही, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या बातम्या चालल्या आहेत. या गोष्टीला आता 14 महिने झाले आहेत. प्रत्येक यंत्रणा काम करते आहे. या बातम्यामध्ये काही अर्थ नाही. जो पर्यंत कुठला निकाल नाही. तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा विचारच नाही. मी फक्त विकासासाठी काम करतो. केवळ विकास हेच आमचं ध्येय आहे, असंही अजित पवार म्हणाले.
मुस्लिम आरक्षणासाठी अजित पवार आग्रही आहेत. तशी बैठकही त्यांनी घेतली होती. त्यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी अल्पसंख्याक मंत्री आणि इतर मंडळी बरोबर बैठक घेतली होती. यात वक्फ बोर्डबद्दल चर्चा झाली. मी पण सांगितलं की, महाराजांचा आदर्श समोर ठेऊन आणि शाहू फुलांची विचारधारा यांना घेऊन मी पुढे जातोय.दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता सगळे कामं होतील. कायद्याच्या चौकटीत सगळं बसवले जाईल आणि निर्णय होईल, असं अजित पवार यांनी सांगितलं.
आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. अजित पवार यांनी यावरही प्रतिक्रिया दिली आहे. खूप वेळा बैठका झाल्या. खूप वेळा अनेक रिसर्च झाला आहे. धनगर समाजाला समाधान मिळेल असे आरक्षण मिळायला हवं. धनगर समाजाला एनटीमधून आरक्षण मिळायला हवं होतं. पण ते धनगड आणि धनगरवरुन अडकलं आहे, असं अजित पवार म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा