Ajit Pawar : अजितदादा मुख्यमंत्री होणार का? आठवलेंनी दिले आपल्या स्टाईलने उत्तर

 

 

ब्युरो टीम: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच 2024 विधानसभेची निवडणूक आम्ही सर्वजण एकत्रित लढणार आहोत. आमच्यामध्ये अजिबात वाद नाही, वाद लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.ते एका कार्यक्रमासाठी बीडमध्ये आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले आठवले?

गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता आठवले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे तोपर्यंत कुणाचाही मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच येत नाही, आमच्यामध्ये अजिबात वाद नाही, वाद लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच 2024 विधानसभेची निवडणूक आम्ही सर्वजण एकत्रित लढणार आहोत, असं आठवले यांनी म्हटलं आहे. ते बीडमध्ये बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. 40 पेक्षा जास्त आमदार सोडून गेल्याने शरद पवार हे अस्वस्थ आहेत. लोक त्यांना सोडून जात असल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. तर उद्धव ठाकरे यांचा जळफळाट सुरू असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने