ब्युरो टीम : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. अजितदादा पवार हे राष्ट्रवादीचे एकमेव नेते जे आहेत. ते चांगलं काम करत आहेत आणि सध्या ते भाजपसोबत आहेत. त्यामुळे सध्याच्या युती सरकारकडून चांगली कामं होत आहेत आणि येत्या काळातही होत राहतील, असा विश्वास आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.
मी कुठल्याही पदासाठी देवेंद्रजींचा विचार करत नाही. ते ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चांगल काम करत आहेत. 2024 मध्ये भाजप एक नंबर पार्टी होवो. हीच प्रार्थना देवाकडे केली. अजून त्रिदेव राज्यात आहेत. समोर मी त्यांच्या पाठीशी आहे. पर्सनली त्यांच्या पाठीशी आहे. एकमेव अजितदादा हे राष्ट्रवादीतील नेते आहेत.जे चांगलं काम करत आहेत. ते आता आपल्याकडे आहेत, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांनी देशसेवेचं व्रत घेतलेय. त्यासाठी ते जे काही करत आहेत. त्या गोष्टी पूर्ण होवोत, असं गणरायाला साकडं घातलं. राष्ट्रवादीमध्ये फक्त अजित पवारच काम करतात. ते आमच्याकडे यावेत असं मला वाटत होतं आणि ते आलेही. याचा आनंद आहे. सध्या युती सरकार चांगलं काम करत आहे, असं अमृता यांनी म्हटलं आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यावरही अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे हे सच्चे कार्यकर्ते आहेत. ते प्रशासनाच्या मागे लागून काम करत आहेत. ते काय बोललेत मला माहिती नाही, असं त्या म्हणाल्या.
दोन दिवसाआधी नागपुरात आलेल्या पुरावरही अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं. नागपूरमध्ये ढगफुटी सारखा पाऊस झाला. इतक्या मोठ्या पावसाला सामोरं जाण्याची नागपूरची तयारी नव्हती. मात्र भविष्यात असं घडायला नको. यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही, नद्या प्रदूषित व्हायला नको. नागपूरमध्ये पुन्हा अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी नियोजन करणं ही तिथल्या प्रशासनाची जबाबदारी आहे, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा