Asia Cup २०२३ : रोहित शर्माचा झेल !नेपाळ १०२ वर ४

 

ब्युरो टीम: कुशल भार्तेल आणि आसिफ शेख यांनी नेपाळला दमदार सुरुवात करून दिली. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्याकडून सुटलेल्या झेलचा त्यांनी पुरेपूर फायदा उचलला.

दोघांनी ९.२ षटकांत ६५ धावा जोडल्या, परंतु शार्दूल ठाकूरने पहिला धक्का दिला. त्यानंतर रवींद्र जडेजाने  फिरकीच्या तालावर नेपाळला नाचवले. कर्णधार रोहित शर्माने सहकाऱ्यांना झेल कसा घ्यावा हे शिकवले. रोहितने नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलचा स्लीपमध्ये अफलातून झेल घेतला.

आशिया चषक स्पर्धेत नेपाळविरुद्ध विजय मिळवून सुपर ४ मध्ये जाण्याचा भारतीय संघाचा मानस आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीच्या पहिल्याच षटकात श्रेयस अय्यरने स्लीपमध्ये, तर मोहम्मद सिराजच्या चेंडूवर शॉर्ट कव्हरला विराट कोहलीने सोपा झेल टाकला. पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यष्टिरक्षक इशानकडून चूक झाली. क्षेत्ररक्षकांचा हा खेळ पाहून रोहितचा पारा चढलेला. मिळालेल्या जीवदानानंतर नेपाळच्या सलामीवीरांनी चांगला खेळ केला अन् ९ षटकांत फलकावर अर्धशतक झळकावले. ६५ धावांची ही भागीदारी शार्दूल ठाकूरने १०व्या षटकात तोडली. यावेळी इशानने झेल घेतला अन् कुशल भुर्तेल ३८ ( २५ चेंडू, ३ चौकार व २ षटकार) धावांवर माघारी परतला. 

रवींद्र जडेजाने भारताला दुसरे यश मिळवून दिले. भीम शार्की ( ७) याचा त्रिफळा त्याने उडवला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर भारताला विकेट मिळाली होती, पंरतु नेपाळच्या फलंदाजाने DRS घेतला अन् तो वाचला. जडेजाने आणखी एक विकेट मिळवून दिली. नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलचा ( ५) स्लीपमध्ये रोहित शर्माने अप्रतिम झेल टिपला. जडेजाने टाकलेल्या चेंडूवर पौडेलने मागे येऊन कट मारण्याचा प्रयत्न केला, पंरतु चेंडू फार न वळल्याने तो त्याच्या बॅटला लागून वेगाने स्लीपच्या दिशेने गेला. रोहितने तितक्याच चपळाईने तो झेल टिपला. जडेजाने पुढच्याच षटकात कुशल मल्लाला ( २) बाद केले. मोहम्मद सिराजने हा झेल टिपला अन् नेपाळचा चौथा फलंदाज १०२ धावांवर माघारी परतला. जडेजाची ही तिसरी विकेट ठरली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने