Bharat: इंडिया की भारत? सोशल मीडियावर दिवसभरात सर्वाधिक सर्च; लोकांनी निकालच लावला;

ब्युरो टीम: राष्ट्रपतींच्या निमंत्रण पत्रिकेवर इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख झाला आणि येत्या विशेष अधिवेशनात काय होणार आहे याची कल्पना देशवासियांना आली आहे. घटनेतील इंडिया हा शब्द काढून टाकला जाऊ शकतो, यासाठी सुधारणा विधेयक आणले जाणार आहे.

यातच इंडिया की भारत अशा दोन नावांच्या द्विधा मनस्थितीत असताना सोशल मीडियावर भारत हा शब्द कालच्या दिवसातील सर्वाधिकवेळा सर्चमध्ये आला आहे

इंडिया आणि भारत हे नाव कसे ठेवले गेले...; जाणून घ्या संविधान बनवितानाची कहानी

ट्विटर म्हणजेच आताच्या एक्सवर मंगळवारी भारत हा शब्द सर्वाधिक वेळा सर्च केला गेला आहे. जगभरात भारत हा की वर्ड सर्वाधिकवेळा वापरला गेला आहे. जगभरातील युजर्सनी चार लाख ७४ हजार वेळा भारत कीवर्ड आपल्या पोस्टमध्ये वापरला आहे.


G20 शिखर परिषद 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानावर होणार आहे. राष्ट्रपती भवनातून परदेशी पाहुण्यांना डिनरमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पत्र पाठवण्यात आले आहे. निमंत्रण पत्रावर इंडियाच्या राष्ट्रपतींऐवजी 'भारत'चे राष्ट्रपती लिहिले होते. यावरून दिवसभर बराच वाद झाला आहे.


हे आहेत सर्वाधिक वापरलेले कीवर्ड...

भारत: 474k

Beyonce: 350k

कलम 1: 284k

प्रदामोडे: 253 किमी

शिक्षक दिन: 165k

कार्डी: 116k

पुग्डेमॉन्ट: 110k

क्लेमसन: 100k

ड्यूक: 83k

wwe raw: 81k

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने