भाजपाने (BJP4Maharashtra) 'आयत्या बिळावर नागोबा' ही उपमा देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या नेत्याला दिले उत्तर

 

        ब्युरो टीम: अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj)  वाघनखे (Wagh Nakh) लवकरच मायभूमीत परत येणार आहे. शिवरायांची जगदंबा तलवार आणि वाघनखे ही लंडनमध्ये आहेत. ती महाराष्ट्रात परत यावीत याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. ब्रिटनने वाघनखे परत देण्यास मान्यता दिली असून, ती लवकरच भारतात परत येणार आहेत.  

        ब्रिटन सरकारकडून या संदर्भातील पत्र मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं परत आणण्यासाठी भारत  इंग्लंडसोबत सामंजस्य करार करणार  आहे. सध्या लंडनमधील विक्टोरिया एंड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ही वाघनखं ठेवण्यात आली आहे. सगळ्या औपचारिकता वेळेत पूर्ण झाल्यास या डिसेंबरपूर्वीच वाघनखं महाराष्ट्रात आणली जाण्याची शक्यता आहे.

        छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात आणली  जाणार हि बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपण हा ऐतहासिक ठेवा परत मिळण्याबाबत १४ ऑगस्ट २०२३ ला राज्यपालाची भेट घेतल्याचे व त्यांना पत्र दिल्याचे ट्विट केले होते.  रोहित पवार यांच्या या ट्विटला भाजप महाराष्ट्र यांच्या अधिकृत पेज वरून उत्तर देण्यात आले आहे. 

        भाजपा महाराष्ट्र ने आपल्या  ट्विट मध्ये लिहले आहे "आयत्या बिळावर नागोबा" ६ डिसेंबर २०२२ रोजी देवेंद्रजी यांनी अमितजी शहा यांच्याशी चर्चा करून शिवरायांची वाघनखं परत आणण्यासाठी प्रयत्न केले, आणि आता त्याला यश येत आहे तर सवयीप्रमाणे  @RRPSpeaks इथ पण आयत्या पिठावर रेघा ओढण्याचे काम करत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने