भाजप महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेत अवतरला जोकर

 


        जळगावमध्ये झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत टीका केली होती. या नंतर भाजपा चांगलीच आक्रमक झाली असून भाजपा कडून या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंनी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chira Wagh) यांनी उद्धव ठाकरेंना विदूषकाचा ड्रेस पाठवलाय. उद्धव ठाकरे यांना आपण करमणूकीपुरते राहिलो असे वाटलं पाहिजे म्हणून जोकरचा ड्रेस पाठवत असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. चित्रा वाघ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक जोकर देखील आणण्यात आला होता. स्वतःच्या सडलेल्या बुद्धीचा भोपळा बाहेर आणण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ना घर का ना घाट का? अशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

        विदूषकांची टोळी राज्यात फिरतेय यात पहिले आहेत संजय राऊत, दुसरं आहे भास्कर जाधव आणि तिसरा विदूषक उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेकडे दुसरे काम उरल नाही म्हणून ते करमणूक करत आहेत असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला. आमच्या नेत्यांच्या नादी लागू नका. तुम्ही आमच्या नेत्यांवर बोलाल पण यापेक्षा कडक उत्तर देऊ असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांना गोध्रा दिसते. उद्धव ठाकरे हिंदू विरोधी झाले आता श्रीरामा बद्दल देखील ते बोलत आहेत असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला. 370 काम हटवून दाखवलं हा पुरुषार्थ आहे. पण उद्धव ठाकरे यांचा पुरुषार्थ काय तर कोविड काळात भ्रष्टाचार, पत्राचाळ घोटाळा, यात आहे असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने