ब्युरो टीम: पठाण आणि जवान च्या यशानंतर चाहते शाहरुख खान च्या डंकी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून त्यामुळे लोकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
अलीकडेच, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, शाहरुखने यावर मौन सोडले असून सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.
जवान चित्रपटाच्या सक्सेस निमित्ताने नुकतीच एक पत्रकार परीषद घेण्यात आली. त्यावेळी शाहरुख खानने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. "मी दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. पठाणला एवढं मोठं यश मिळालं यावर देवाची कृपा आहे. देव जवानच्या बाबतीत आणखी दयाळू राहिला असेल की आणखी लोकांनी त्याच्यावर प्रेम केले."
डंकी या दिवशी होणार रिलीज
डंकी सिनेमा ख्रिसमसला रिलीज होत आहे. शाहरुख खान म्हणाला, "आम्ही २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाला सुरूवात केली. हा एक चांगला, शुभ दिवस आहे. त्यानंतर भगवान कृष्णाच्या जन्मदिवस जन्माष्टमीला आम्ही हा चित्रपट प्रदर्शित केला आणि आता ख्रिसमसला आम्ही डंकी आणू. माझा राष्ट्रीय एकात्मतेवर विश्वास आहे."
जवान सिनेमाची दमदार कामगिरी
अॅटली दिग्दर्शित जवान या चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अॅक्शन थ्रिलरने जगभरात सुमारे ७०० कोटी रुपये आणि एकट्या भारतात ४०० कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे तो 'पठाण' आणि गदर २ नंतरचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे.
वर्षभरात तीन चित्रपट प्रदर्शित होतील
तो पुढे गंमतीने म्हणाला, "असो, माझा चित्रपट जेव्हा रिलीज होतो तेव्हा ती ईद असते." तुम्हाला सांगतो की, दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत शाहरुखचा 'डंकी' हा पहिला चित्रपट आहे. यात तापसी पन्नू आणि विकी कौशल यांच्याही भूमिका आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. २००४ नंतर शाहरुखचे एका वर्षात तीन चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
टिप्पणी पोस्ट करा