ब्युरो टीम: अभिनेते सनी देओल यांना पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘गदर 2’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसंच आहे.
सिनेमाने फार कमी काळात बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. ‘गदर 2 ‘ सिनेमा सलग 26 दिवस चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ सिनेमाने 25 दिवसांमध्ये 500 कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. त्यामुळे आता किती दिवस तारा सिंग आणि सकिना प्रेक्षकांचं मनोरंजन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
प्रदर्शनानंतर पहिल्या दिवशी सिनेमाने तब्बल 40.10 कोटी रुपयांची कमाई केली होती. पहिल्या आठवड्यात सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले. दुसऱ्या आठवड्यापासून सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला असला तरी सिनेमाने अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे.
‘गदर 2’ बॉक्स ऑफिसवर बोलबाला;
अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर 2’ सिनेमाने प्रदर्शनानंतर 26 व्या दिवशी 3.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘गदर 2’ सिनेमाने आतापर्यंत 506.86 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. त्यामुळे सिनेमा येत्या दिवसांमध्ये किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सांगायचं झालं तर, सनी देओल स्टारर ‘गदर 2’ सिनेमा अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. ‘पठाण’ सिनेमाला 500 कोटी रुपयांचा गल्ला पार करण्यासाठी 28 दिवस लागले होते. तर ‘गदर 2’ सिनेमाने फक्त 25 दिवसांमध्ये 500 कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. अखेर सनी देओल यांनी किंग खान याचा रेकॉर्ड मोडला आहे…
‘गदर २’ सिनेमाने ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. अशात सिनेमा येत्या दिवसांत किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 7 सप्टेंबर 2023 मध्ये किंग खान याचा ‘जवान’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘जवान’ सिनेमा ‘गदर 2’ चा रकॉर्ड मोडेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ सिनेमाने देखील प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तर ‘गदर’ सिनेमाचा सिक्वल देखील चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘गदर 2’ आणि सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची चर्चा सुरु आहे.
टिप्पणी पोस्ट करा