Ganesh Chaturthi: तुम्हाला गणेश स्थापना करण्याची योग्य पद्धत माहित आहे का?


 

यावर्षी गणेश चतुर्दशी म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन (Ganesh Agaman) मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी होत आहे. आपण गणेश चतुर्दशीचे  महत्त्व काय आणि पद्धत काय याबद्दल जाणून घेऊया. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सव सुरू होतो व अनंत चतुर्दशी तिथीपर्यंत गणेशाची पूजा केली जाते. श्री गणेश मूर्तीची स्थापना चतुर्थी तिथीला केली जाते आणि विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते. या नऊ दिवसांना गणेश नवरात्र असेही म्हणतात. असे मानले जाते की मूर्तीचे विसर्जन केल्याने गणेश भगवान पुन्हा कैलास पर्वतावर पोहोचतात. या दिवशी अनंत शुभ फळ मिळू शकतात, म्हणूनच या दिवसाला अनंत चतुर्दशी म्हणतात.

        गणपतीची स्थापना पूर्ण विधीपूर्वक केली जाते, त्याचप्रमाणे गणेश मूर्तीचे विसर्जनही विधीपूर्वक केले जाते. आपण या दिवशी देवाला पुढच्या वर्षी परत या हीच कामना करतो. गणेश चतुर्दशी या दिवशी सकाळपासून उपवास करणे शुभ मानले जाते.जर आपणास उपवास ठेवता येत नसेल फलाहार करणे. या दिवशी घरात स्थापित मूर्तीची विधिवत पूजा करावी, पूजेत नारळ, शमीची पाने गणेशास अर्पण करा. 

मूर्ती घेऊन येताना लेदर बेल्ट, घड्याळ किंवा पर्स सोबत ठेवने टाळावे. प्लॅस्टिकच्या मूर्ती किंवा चित्रे बसवू नका किंवा विसर्जित करू नका. आगमनानंतर, हात जोडून, ​​कल्याण आणि आनंदी जीवनासाठी श्री गणेशाला प्रार्थना करा. गणेश चतुर्दशीच्या व्रताने सर्व संकटे दूर होतात. चतुर्दशीला मनोभावे व विधीपुर्वक गणेशाचे स्थापना करून तुम्ही तुमच्या जीवनात गणेशाची कृपा मिळवू शकता.

        

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने