ब्युरो टीम: शरीरातील मसल्स आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी लोक प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा आाहारात समावेश करतात. स्नायूंच्या विकासासाठी कार्ब्सप्रमाणे प्रोटीन्ससुद्धा गरजेचे असतात. कार्ब्स दोन प्रकारचे असतात
ज्यात कॉम्पेलेक्शन कार्ब्सचा समावेश होतो. हे शरीराला वर्कआऊटदरम्यान एनर्जी देतात. तुम्ही डाएटमधून या पदार्थांना काढलं तर शरीरातील मसल्स कमी होतील.
एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार रताळ्यात कॉम्पलेक्स कार्ब्सचे प्रमाण जास्त असते. एनर्जीबरोबरच मसल्सना रिपेअर करण्याासाठी मदत होते. रताळे खाल्ल्याने शरीराला प्रोटीन्स, फायबर्स, व्हिटमीन सी, पोटॅशियम, व्हिटामीन बी-६, व्हिटामीन बी-५ मिळते.
केळ्याचा आहारात समावेश केल्याने पोटॅशियम, व्हिटामीन सी, मॅग्नेशियम मिळते. मसल्स वाढवण्याासठी हेल्दी कार्ब्सबरोबर पोषणाची आवश्यकता असते. केळी खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
क्विनोआ एक कंप्लीट प्रोटीन फूड आहे. यात मसल्ससाठी गरजेचे असणारे अमिनो एसिड्स असतात. कॉम्पलेक्स कार्ब्सही असतात. ज्यामुळे ताकद वाढवण्यास मदत होते.
आयर्न आणि व्हिटामीनयुक्त हिरव्या पालेभाज्या तब्येतीसाठी उपयुक्त ठरतात. यात प्रोटीन्स कार्ब्स यांबरोबर फायबर्स जास्त असतात. ज्यामुळे पचनतक्रिया चांगली राहते. यातून शरीराला बरीच पोषक तत्व मिळतात.
फायबर्सव्यतिरिक्त यात फॉलेट, आयर्न, पोटॅशियमसुद्धा असते. याशिवाय यात कॉम्पलेक्स कार्ब्स असतात. यामुळे मसल्स वाढण्यास मदत होते. थकवा, कमकुवतपणा दूर होतो.
पनीरमध्ये मध्ये प्रोटीन्स मोठ्या प्रमााणात असतता. रोजच्या जेवणात प्रोटीन्सचा समावेश केल्यास तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल आणि स्नायूंचा विकास होईल.
टिप्पणी पोस्ट करा