Health : प्रेमासह आरोग्यासाठी गुलाब फायदेशीर; जाणून घ्या!

 

ब्युरो टीम: गुलाबाचं फूल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्यात गुलाबाचे फुल हे सर्वांचं आवडतं फूल आहे. हे फूल दिसायला जितकं सुंदर असतं तितकंच ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. गुलाबापासून बनवलेले गुलकंद खायला खूपच चविष्ट लागते.

तसेच आता या फुलाचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत.

गुलाब आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. त्यासाठी नियमित गुलाबाच्या पाकळ्या खाणे गरजेचे आहे. गुलाबांमध्ये विटामिन सी असते जे आपल्या शरीराला लोह देण्यास मदत करते. तसेच गुलाबामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म असतात जे आपले अनेक आजारांपासून संरक्षण करते. त्यामुळे गुलाबाच्या पाकळ्या खाणं हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतं.

बहुतेक लोकांना माहिती नसेल पण गुलाबापासून चहा देखील बनवला जातो. या चहाला रोजहिप चहा असे म्हटले जाते. तर हा गुलाबाचा चहा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. हा चहा पिल्यामुळे आपला तणाव कमी होण्यास मदत होते तसेच आपल्या मनाला शांतता देखील मिळते.

बहुतेक लोकांना डोकेदुखीची समस्या त्रास देत असते. तर अशावेळी गुलाबाचे तेल लावणे फायदेशीर ठरते. गुलाबाचे तेल लावल्यामुळे फक्त डोकेदुखीच नाही तर तुमची गुडघेदुखी कमी करण्यास मदत होते. गुलाबाचे तेल हे आपल्या शरीरातील वेदना कमी करण्यास उपयुक्त ठरते. तर तुम्हालाही डोकेदुखी, पाय दुखीचा त्रास सतावत असेल तर दररोज रात्री गुलाबाचे तेल लावा त्यामुळे तुमची ही समस्या दूर होईल.

जर तुमचा मूड सतत स्विंग होत असेल तर गुलाबाचे दूध पिणे फायदेशीर ठरू शकते. तसेच बहुतेक लोकांना रात्रीची शांत झोप येत नाही त्यामुळे अनेक आजार देखील निर्माण होऊ शकतात. तर अशावेळी गुलाबाचे दूध पिणे फायदेशीर ठरते. गुलाबाचे दूध पिल्यामुळे मनाला शांतता मिळते आणि झोप देखील शांत लागते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने