Hindu Heritage Month: 'ऑक्टोबर'ला 'हिंदू वारसा महिना' म्हणून केले घोषित; अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याने कलेची घोषणा जाणून घ्या काय आहे प्रकरण

 

ब्युरो टीम: अमेरिकेच्या जॉर्जिया (Georgia) राज्याने 'ऑक्टोबर' या महिन्याला अधिकृतपणे 'हिंदू हेरिटेज मंथ' (Hindu Heritage Month) म्हणून घोषित केले आहे. राज्यातील हिंदू-अमेरिकन समुदायाचे योगदान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.


जॉर्जियातील हिंदू संघटना अनेक दिवसांपासून याची मागणी करत होत्या. ऑक्टोबर महिना हिंदूंसाठी खूप खास मानला जातो. या महिन्याची खास अशी सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख आहे. या महिन्यात महात्मा गांधींचा जन्मदिवस 2 ऑक्टोबरला येतो, त्याचप्रमाणे नवरात्री आणि दिवाळी असे सणही याच महिन्यात येतात.

ऑक्टोबर हा हिंदू वारसा महिना म्हणून घोषित केल्याबद्दल अमेरिकेतील अनेक हिंदू संघटनांनी जॉर्जियाचे गव्हर्नर ब्रायन केम्प यांचे आभार मानले आहेत. जॉर्जियन गव्हर्नर ब्रायन केम्प यांनी ऑक्टोबर हा हिंदू हेरिटेज मंथ म्हणून घोषित केल्याचे X (Twitter) वर कोलिशन ऑफ हिंदू ऑफ नॉर्थ अमेरिकेने जाहीर केले आहे. गव्हर्नर ब्रायन केम्प म्हणाले की, हिंदू वारसा महिना हा भारतीय संस्कृती आणि तिथे रुजलेल्या विविध आध्यात्मिक परंपरांवर लक्ष केंद्रित करून साजरा केला जाईल. याआधी 23 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात, गव्हर्नर  म्हणाले होते की, हिंदू-अमेरिकन समुदायाने जॉर्जियन लोकांचे जीवन समृद्ध करून राज्याच्या जीवन शक्तीसाठी मोठे योगदान दिले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, जॉर्जिया विधानसभेने 'हिंदूफोबिया' (हिंदू धर्माविरूद्ध पूर्वग्रह) निषेध करणारा ठराव संमत केला, ज्यामुळे असा विधायी ठराव पारित करणारे ते पहिले यूएस राज्य बनले. प्रस्तावात 'हिंदुफोबिया' आणि हिंदूविरोधी कट्टरतेचा निषेध करत, अमेरिकन समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीत आणि लाखो लोकांचे जीवन सुधारण्यासाठी योग, आयुर्वेद, ध्यान, भोजन, संगीत आणि कलांमध्ये हिंदू समुदायाने दिलेल्या योगदानावर प्रकाश करण्यात आला. (हेही वाचा: 

हिंदू हेरिटेज मंथ ही एक जागतिक चळवळ आहे जी हिंदू धर्मातील परंपरा आणि हिंदू लोकांचे मानवी समाजातील योगदान म्हणून अधोरेखित करते. हिंदू धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे, या धर्माचे जगभरात एक अब्ज अनुयायी आहेत. सुमारे तीस लाख हिंदू लोक युनायटेड स्टेट्समध्ये राहत असून, ज्यांचे तिथले राजकारण आणि समाजकारणातही महत्त्वपूर्ण योगदान आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने