ब्युरो टीम : ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ची ट्रॉफी कोण जिंकेल याच्याकडे अनेकांच्या नजरा होत्या. अखेर ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ ची ट्रॉफी पुण्याच्या समर्पण लामा याने जिंकली आहे. ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ ट्रॉफीवर स्वतःचे नाव कोरल्यामुळे समर्पण लामा याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सध्या सर्वत्र समर्पण लामा याची चर्चा रंगली आहे. समर्पण लामा याला ट्रॉफीसह १५ लाख रुपयांचा बक्षीस देखील मिळालं आहे. समर्पण लामा याने ट्रॉफी जिंकल्यामुळे पुण्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. यावेळी फक्त समर्पण लामा यालाच नाही तर, त्याची कोरिओग्राफर भावना खंडुजा यांनाही देखील बक्षीस देवून सन्मानित करण्यात आलं आहे. कोरिओग्राफर भावना खंडुजा यांना ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. कारण इंडियाज बेस्ट डान्सर या शोच्या मंचावर स्पर्धक त्यांच्या नृत्यदिग्दर्शकांसोबत परफॉर्म करतात.
अभिनेते गोविंदा आणि अभिनेत्री क्रिती सॅनन यांच्या उपस्थितीत इंडियाज बेस्ट डान्सरचा ग्रँड फिनाले सुरू झाला. समर्पण लामा याच्यासह शिवांशू सोनी, अंजली ममगाई, विपुल कंदपाल आणि अनिकेत चौहान यांचाही टॉप 5 मध्ये समावेश होता. शेवटच्या क्षणी टॉप ५ स्पर्धांच्या मनावर दडपण होतं. अखेर विजेता म्हणून समर्पण लामा याच्या नावाची घोषणा झाली आणि त्याच्या चाहत्यांनी कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला.
‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर समर्पण लामा याने आनंद व्यक्त केला. ‘मी कायम टीव्हीवर शो पाहायचो. शो पाहिल्यानंतर मी देखील स्वप्न पाहायला लागलो होतो. पण इंडियाज बेस्ट डान्सर सारख्या शोचा विजेता होईल असे मला कधीच वाटले नव्हतं..’ सध्या सर्वत्र समर्पण लामा याची चर्चा रंगली आहे.
पुढे अभिनेता म्हणाला, ‘माझ्यासाठी हे सर्वकाही स्वप्नासारखं आहे. जेव्हा अनिकेत चौहानसह परीक्षकांनी मला ‘टॉप 13’मध्ये प्रवेश दिला, तेव्हा तो माझा विजय होता. कारण शोमध्ये मी एवढ्या पुढे जाऊ शकेन याची मला कल्पना नव्हती. शोमध्ये मला यश मिळालं, पण अनेक ठिकाणी मी मागे राहिलो… असं देखील समर्पण म्हणाला..
‘ज्या गोष्टींमध्ये मला अपयश मिळाले, त्यातून मी खूप काही शिकलो आणि पुढे प्रवास सुरु केला. अधिक मेहनत घेतली. मी प्रचंड मेहनत, कष्ट केले आणि ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली.. हा शो कायम माझ्या स्मरणात राहिल. मी सर्वांचे आभार मानतो, ज्यांनी मला मतदान केलं.’ असं देखील समर्पण लामा म्हणाला.
टिप्पणी पोस्ट करा