ब्युरो टीम: भारत आणि बांगलादेशमध्ये आज आशिया कप सुपर फेरीमधील अखेरचा सामना रंगणार आहे. भारताच्या विजयी रथाला बांगलादेशचा संघ रोखणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रोहित शर्मा याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियात पाच बदल करण्यात आले आहेत. “आम्ही पाच बदल केले आहेत. तिलक वर्मा या सामन्यात खेळणार आहे. शमी, शार्दुल आणि प्रसिध्दचं संघात पुनरागमन झालं आहे. तसेच सूर्यकुमारचाही समावेश करण्यात आला आहे.”, असं रोहित शर्मा म्हणाला.
भारत आणि बांगलादेशमध्ये आज आशिया कपमधील शेवटचा सामना रंगणार आहे. फायनलआधी भारताचा सुपर 4 फेरीमधील अखेरचा सामना असून बांगलादेश आपला शेवट गोड करणार की भारत आपल विजयरथ सुरू ठेवणार हे पाहावं लागणार आहे.
आशिया कप 2023च्या सुपर 4 मधील पाचवा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय संघाने आशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. बांगलादेश संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मात्र शेवटचा सामना जिंकण्याचा बांगलादेश संघाचा पूर्ण प्रयत्न असेल. आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघामध्ये काही बदल केलेले पाहायला मिळू शकतात. महत्त्वाच्या खेळाडूंना फायनल सामन्याधी विश्रांती दिली जावू शकते.
दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी पाहता भारतीय संघाचं पारडं जड आहे. भारत-बांगलादेशमध्ये आतापर्यंत 39 सामने झाले आहेत. यामधील तब्बल 31 सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवल आहे तर 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. एक सामन्याचा निकाल लागू शकला नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असून कोणताही सामना कधीही पालटला जावू शकतो.
आशिया कप 2023 साठी बांगलादेश टीम | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शांतो, तॉहिद हृदॉय, मुशफीकुर रहीम, मेहंदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसेन, शरीफुल इस्लाम, एबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.
टिप्पणी पोस्ट करा