Jammu- Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये आता शांतता नांदतेय; सैनिकांवरील दगडफेकीच्या घटनांमध्ये 99% घट

 

ब्युरो टीम:जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर राज्यातील परिस्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये यापूर्वी जवानांवर होणारे हल्ले, दगडफेक आणि घुसखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.

विशेष म्हणजे, दगडफेकीच्या घटना जवळजवळ पूर्णपणे संपल्या आहेत. यावरुन जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट होते.

सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण 60 टक्के कमी

मीडिया रिपोर्टनुसार, सुरक्षा दलांमधील घातपात, म्हणजेच सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण 60 टक्क्यांनी कमी झाले आहे. या वर्षी जी-20 बैठकही श्रीनगरमध्ये झाली. केंद्रीय गृह मंत्रालय जम्मू आणि काश्मीरवर लक्ष ठेवून आहे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नियमित अंतराने बैठका सुरू असतात.

दगडफेकीच्या घटनांमध्ये मोठी घट

आकडेवारीनुसार, 2020 च्या पहिल्या सहा महिन्यांत, स्थानिक अधिकाऱ्यांनी दगडफेकीच्या एकूण 324 घटनांची नोंद केली. पुढच्या वर्षी अशा घटना 179 पर्यंत खाली आल्या. 2022 आणि 2023 मध्ये याच कालावधीत एकूण 50 आणि 3 घटनांची नोंद झाली आहे. 2020 पासून जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या सुरक्षा जवानांच्या संख्येत मोठी घट दिसून आली आहे, हा आकडा 32 वरून 11 वर आला आहे.

स्फोटकांच्या जप्तीमध्ये मोठी घट

जम्मू-काश्मीरमधून स्फोटके आणि ग्रेनेड्सच्या जप्तीतही घट झाली आहे. 2021 मध्ये सुरक्षा दलांनी सुमारे 68 किलो स्फोटके जप्त केली. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ही संख्या शून्य आहे. 2020 मधील 266 वरून 2023 मध्ये ग्रेनेड जप्तीचे प्रमाण 83 पर्यंत कमी झाले आ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने