Jawan: 'जवान'चा ट्रेलर पाहून खरं तर गोंधळात शाहरुख खान हिरो कि खलनायक ; विजय सेतुपतीचा भन्नाट किस्सा

 

ब्युरो टीम: 'जवान'चाट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये शाहरुखचे बरेच लुक दिसत आहेत. तसंच वेगवेगळ्या टाईमलाईनमध्ये ही स्टोरी असल्याचं ट्रेलरमधून दिसत आहे.

दरम्यान ट्रेलर रिलीजपूर्वी 'जवान'चा ऑडिओ लाँच चेन्नईमध्ये पार पडला. यावेळी शाहरुख खानसोबतच विजय सेतुपति , योगी बाबू, संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंद्रन आणि दिग्दर्शक अॅटली कुमार उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच आपापले अनुभव सांगितले. शाहरुखचा बदला घ्यायला मला अनेक वर्ष लागली असं विजय सेतुपति म्हणाला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले.

'जवान'चा ट्रेलर पाहून खरं तर गोंधळच वाढला आहे. शाहरुखचे नेमके किती लुक आहेत यावरुन चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. तसंच विजय सेतुपति व्हिलनच्या भूमिकेत आहे मात्र तोही नायकासारखाच दिसतोय. आता हे सर्व प्रश्न सिनेमा पाहिल्यावरच सुटतील. ऑडिओ लाँच इव्हेंटमध्ये विजय स्टेजवर येत म्हणाला, 'शाळेत असताना मला एक मुलगी आवडायची. मात्र तिला हे माहित नव्हतं. प्रत्येक जानूचा एक राम तर असतोच. तसंच त्या मुलीला शाहरुख खान आवडत होता. याचा बदला घेण्यासाठी मला इतकी वर्ष लागली.'

विजय सेतुपतिने सांगितलेल्या या आठवणीनंतर सगळेच हसले. यावर शाहरुख म्हणाला, 'इथे सगळेच तमिळमध्ये बोलत आहेत. मला आशा आहे की विजय सेतुपतिला सोडून सगळे माझ्याबद्दल चांगलंच बोलत असतील जो माझ्यासमोर मुलींबद्दल बोलतोय. मी तुम्हाला सांगतो सर तुम्ही तुमचा बदला घेऊ शकता पण मुलींना माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही.'

'जवान' ७ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. कालच ट्रेलर प्रदर्शित झाला असून काही तासातच मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. लवकरच पहिल्याच दिवशी सिनेमा १०० कोटी कमावेल असे तर्क लावले जात आहेत. पठाणनंतर शाहरुखचा 'जवान'ही तुफान कमाई करणार असं चित्र आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने