ब्युरो टीम: गोकुळाष्टमीला (Krishna Janmashtami 2023)दही-दूधाचे नैवेद्याचे पदार्थ बनले जातात आणि प्रसादही दह्याचा बनवला जातो. नेहमी बाहेरून दही विकत आणण्यापेक्षा घरच्याघरी दही बनवणं अगदी सोपं आहे.दही आंबट होतं, दह्यात पाणी राहतं अशी तक्रार अनेकांची असते.
गोकुळाष्टमीसाठी घरच्याघरी बनवलेल्या दह्याचा प्रसाद तुम्ही बनवू शकता. घरी विकतसारखं परफेक्ट दही बनवण्याच्या सोप्टा ट्रिक्स पाहूया. दह्यात पाणी राहू नये, दह्याची चव बिघडू नये म्हणून कोणत्या चुका टाळाव्यात हे पाहूया.
1) घरी दही बनवण्यासाठी सगळ्यात आधी फुल क्रिम दूध घ्या. स्वच्छ भांड्यात हे दूध काढून गरम करून घ्या. त्यानंतर दूध थंड करायला ठेवा. तुम्हाला दही जितकं हवं आहे त्यानुसार विरजण बाजूला काढा. जर तुम्हाला अर्धा किलो दही लावायचं असेल तर अर्धा लिटर दूध घ्या आणि एक लिटर दही लावायचं असेल तर एक लिटर फुल क्रिम दूध घ्या. दूध उकळ्यानंतर गॅस बंद करून ते कोमट होईपर्यंत वाट पाहा.
2) त्यानंतर तुम्हाला ज्या भांड्यात दही लावायचं आहे हे भांडं कोरडं करून घ्या. दही लावण्याआधी या गोष्टीची काळजी घ्या की दूध हलकं गरम झालेलं असेल. बरेच लोक एक चूक करतात ते म्हणजे दूध एकदम थंड झाल्यानतंर दही लावतात. याशिवाय फूल क्रिम दूध न घेता साधं दूध घेता. ज्यामुळे दही व्यवस्थित लागत नाही. जर दूध फुल क्रिम असेल तर दही मार्केटसारखं घट्ट बनतं. अन्यथा व्यवस्थित लागत नाही.
3) कोमट दूध दही लावण्याच्या भांड्यात काढल्यानंतर त्यात १ ते २ चमचे दही घालून मिसळा. नंतर भांड अशा ठिकाणी ठेवा जिथे भांड्याला कोणाचाही हात लागणार नाही. ४ ते ५ तास दही पूर्ण दही सेट होण्यासाठी लागतील. झोपण्याआधी दही लावा दुसऱ्या दिवशी सकाळी दही तयार झालेलं असेल.
टिप्पणी पोस्ट करा