Maratha Arkshan : समाजाच्या भल्यासाठी दोन पाऊले मागे घ्यावी लागतात; काही गोष्टी ऐकाव्याही लागतात; जरांगेंवर खोतकर नाराज

 

ब्युरो टीम: समाजाचे जर भले करायचे असेल तर काही गोष्टी ऐकाव्याही लागतात. जरांगे यांनी शासनाला वेळ वाढवून दिला पाहिजे. चर्चा अजून झालेली नाही, चर्चा करण्याकरिता दार अजून उघडेच आहे, असे माजी मंत्री आणि एकनाथ शिंदेंचे शिष्टमंडळ घेऊन आलेले नेते अर्जुन खोतकर यांनी नाराजी व्यक्त केली.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात वातावरण तापले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मंगळवारी मुख्यमंत्र्यांचे एक शिष्टमंडळ आले होते. आंदोलनकर्ते मनोज पाटील जरांगे यांच्या भेटीसाठी व त्यांची समज काढण्यासाठी आज अंतरवाली सराठी येथे दाखल झाले होते, या शिष्टमंडळाने मनोज पाटील जरांगे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली व तीस दिवसाची मुदत सुद्धा यावेळी मागितली गेली. परंतू, जरांगे यांनी कुठल्याही प्रकारची मुदत न देता फक्त चार दिवसाचा अवघी सरकारला देण्याचे मान्य केले आहे.

शिष्टमंडळाचे व मनोज पाटील जरांगे व आंदोलन कर्त्यांची मते न जुळल्यामुळे अखेर आल्यापावली या शिष्ट मंडळाला परत जावे लागले आहे.

30 दिवसांनंतर एक दिवस सुद्धा शासन वेळ घेणार नाही. मात्र, एवढी विनंती करून सुद्धा आंदोलनकर्त्यांनी ऐकलेले नाहीय. चर्चेची दारे उघडीच असल्याचे खोतकर म्हणाले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने