mumbai sports : ताश्कंद येथे 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स एशियन स्पर्धा ; भारतीय संघात १७ मुंबईकर

 

 ब्युरो टीम :उझबेकिस्तानमध्ये पुढील महिन्यात होणार्‍या अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स एशियन स्पर्धेसाठी भारताच्या संघात 17 मुंबईकर खेळाडूंचा समावेश आहे.आशिया खंडातील एका सर्वोत्तम स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व मुंबईचे जिम्नॅस्ट हे लोकमान्य शिक्षण संस्थेच्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूरच्या अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतात

त्यात 13 ते 17 वर्षे वयोगटातील यज्ञेश भोस्तेकर, समर्थ खन्नूकर, नमोह उनियाल आणि अश्विन गोसावी या चौघांची ज्युनियर संघात निवड झाली आहे. ऋतुजा जगदाळे, प्रीती एखंडे, आदित्य खसासे, आकाश गोसावी, आचल गुरव, आशुतोष रेणावकर, अक्षता ढोकळे, अर्ना पाटील, सोनाली बोराडे, नमन महावर, रितेश बोराडे, कुणाल कोठेकर आणि प्रशांत गोरे या मुंबईच्या जिम्नॅस्टचा15 ते 28 वर्षे वयोगटात (सीनियर) समावेश आहे. वेगवेगळ्या शाळा आणि निवडक कंपन्यांमधून या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.


सर्व जिम्नॅस्टना प्रशिक्षक राहुल ससाणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ससाणे हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. त्यांनी अनेक जागतिक स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. राहुल यांना योगेश पवार (शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि जज) आणि सुनील रणपिसे (आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते) या दोन प्रशिक्षकांचे सहकार्य लाभले आहे. सर्व प्रशिक्षक हे गेली अनेक वर्षेकोणतेही शुल्क न घेता प्रशिक्षण देत आहेत.

अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स एशियन स्पर्धा उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे 18 ते 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचे एकूण 46 जिम्नॅस्ट आणि सपोर्ट स्टाफ सहभागी होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने