ब्युरो टीम : अभिनेते नाना पाटेकर आगामी 'द व्हॅक्सीन वॉर' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान सध्या प्रमोशननिमित्त ते विविध मुलाखती देत आहेत. यावेळी त्यांची अनेक विधानं चर्चेत आली आहेत.
त्यातलंच एक म्हणजे हॉलिवूड स्टार लिओनार्डो डी कॅप्रिओसोबत नानांनी बॉडी ऑफ लाईज या सिनेमात काम करण्याची ऑफर नाकारली होती. यामागचं नेमकं काय कारण होतं ते त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.
2008 मध्ये रिलीज झालेला 'बॉडी ऑफ लाईज' हा अमेरिकन स्पाय एक्शन थ्रिलर सिनेमा होता. यामध्ये लिओनार्डो डी कॅप्रिओची मुख्य भूमिका होती. तर नाना पाटेकर यांनाही ऑफर मिळाली. मात्र तो रोल आवडला नसल्याने नानांनी ऑफर नाकारली. नाना म्हणाले,'मी हा सिनेमा नाकारला कारण एक तर मी इंग्रजीत डायलॉग म्हणू शकत नाही. दुसरं म्हणजे जी भूमिका मला ऑफर झाली ती मला आवडली नाही कारण मी दहशतवाद्याची भूमिका साकारु इच्छित नाही. जे लोक मला फॉलो करतात, माझं काम त्यांना आवडतं त्यांना हे अजिबात आवडलं नसतं.'
ते पुढे म्हणाला,'मी द पूल हा हॉलिवूड सिनेमा केला होता. ते लोक अनुराग कश्पला ओळखत होते. त्यांनी अनुरागशी संपर्क साधत कसा कलाकार हवाय याचं वर्णन केलं. ते वर्णन ऐकून अनुरागला मीच त्यासाठी अनुकूल आहे असं वाटलं आणि त्याने माझं नाव सुचवलं. अनुराग मला भेटायला आला आणि या फिल्मबद्दल सांगितलं. मी हो म्हणत किती दिवसांचं शूट आहे विचारलं. तो ७-८ दिवस म्हणाला. नंतर मी विसरुन गेलो आणि ते लोक वाट बघत बसले. नंतर आम्ही १० दिवस शूट केलं.त्यांच्याजवळ मला देण्यासाठी पैसे नव्हते. मी म्हणलं हरकत नाही हा सिनेमा चालणार. तेव्हा सनडेस फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमाला बेस्ट क्रिटिक अवॉर्ड मिळाला.
टिप्पणी पोस्ट करा