Narendra Modi : नरेंद्र मोदींचा आहार ट्राय करा ; आणि त्यांच्या सारखा फिटनेस मिळवा

 

ब्युरो टीम :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय जरी जास्त असलं तरी त्यांचा फिटनेस आणि एनर्जी वाखण्याजोगी आहे. पंतप्रधान मोदींचा फिटनेस पाहून आजच्या तरुणांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. वय झालं असतानाही पंतप्रधान मोदी आजही फिट आणि तंदुरुस्त आहेत. तसेच पंतप्रधान हे नेहमी त्यांच्या कामात व्यस्त असतात तरीदेखील त्यांचा फिटनेस अजूनही कायम कसा काय? असा प्रश्न बहुतेक लोकांना पडतो.

योग निद्रा करणे – पंतप्रधान मोदी नेहमीच कामात व्यस्त असलेले दिसतात त्यामुळे त्यांचे झोपही पूर्ण होत नाही. तरी देखील ते एकदम फ्रेश कसे काय दिसतात? असा प्रश्न बहुतेक लोकांना पडला असेल. तर याबाबत त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता. त्यांनी सांगितलं की, ध्यानाचे आसन करताना आपले शरीर झोपेत जाते परंतु ही झोप एवढी प्रभावी असते की यामधून आपले शरीर रिचार्ज होते आणि काम करण्याची मानसिक क्षमता आपली मोठ्या प्रमाणात वाढते. यासाठी पंतप्रधान मोदी आठवड्यातून दोनदा योग निद्रा नियमित करतात.

वाघारेली खिचडीचा आहारात समावेश- पंतप्रधान मोदींना आपण जेव्हाही पाहतो तेव्हा ते फ्रेश आणि एकदम तंदुरुस्त दिसतात. तर याचं रहस्य आहे वाघारेली खिचडी. पंतप्रधान मोदी गुजरातची प्रसिद्ध वाघारेली खिचडी खातात. त्यांना ही खिचडी भरपूर आवडते. ही खिचडी तांदूळ, मुग, हळद, डाळ आणि मीठ यापासून बनवली जाते. ही खिचडी खाल्ल्याने आपल्याला प्रथिने मिळतात जे आपल्या शरीरातील ऊर्जा टिकून ठेवण्यास मदत करतात.

पंचतत्व योगाने दिवसाची सुरुवात- पंतप्रधान मोदी हे त्यांच्या दिवसाची सुरुवात योगा करूनच करतात. ते पंचतत्व योगा दररोज न चुकता करतात. पंचतत्व योगा म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या निसर्गाच्या पाच घटकांची संबंधित असलेला योगा. हा योगा करताना पंतप्रधान मोदी विरुद्ध दिशेने चालतात, खडकांवर चालतात किंवा चिखलात चालतात तसेच खडकांवरती ते पाठीवरती झोपतात. अशा प्रकारे हा योगा ते करतात. हा योगा केल्यानंतर शरीरातील रक्ताभिसरण होण्यास मदत होते आणि शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते.

हळदीचे सेवन – पंतप्रधान मोदी आजारांपासून सुटका करण्यासाठी दररोज हळदीचे सेवन करतात.  कारण, हळदीमध्ये अँटिबॅक्टरियल गुण असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. हळदीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी देखील हळदीचे सेवन नेहमी करतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने