pankaja mundhe: आपल्या दारात कोण आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवायला लागू नये- पंकजा मुंडे

 

ब्युरो टीम: आपण कुठे उभे आहोत ही पदाची नव्हे तर मनाची अवस्था असते. मी माझ्या मनाच्या अवस्थेतून कधीही स्वत:ला मागच्या रांगेत मानत नाही अशी स्पष्ट भूमिका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना मांडली.

पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरु केली आहे. सातारा, सांगलीनंतर काल, बुधवारी त्यांचे कोल्हापूरमध्ये आगमन झाले. रात्री त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी भेट दिली. सकाळी खासदार धैर्यशील माने यांच्या घरीही भेट दिली. यानंतर त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

अंबाबाई दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाल्या, कोणालाही काही कमी पडू नये, कोणीही उपाशी राहून नये, आपल्याला कोणाच्या दारात जायला लागू नये आणि आपल्या दारात कोण आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवायला लागू नये या इच्छा पूर्ण कर असे मागणे देवीकडे केले आहे. सर्वत्र मुंडे स्टाईल प्रतिसाद मिळत असून आता भव्य सत्कार करु नका असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी खासदार माने, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने