Pune Ganesh Visarjan 2023: 28 तास नंतर मिरवणूक संपली; अलका टॉकीज चौकात अखेर पर्यंत दणदणाट!

 

ब्युरो टीम: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक तब्बल 28 तास 40 मिनिटांनी अखेर संपली. शेवटच्या उंबऱ्या गणपती मंडळाच्या विसर्जनाने ही मिरवणूक संपली. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…या जयघोषात पुण्यातील शेवटच्या गणेश मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले. पुण्यातील अलका टॉकीज चौकात तरुणाई तब्बल 28 तास थिकरताना पाहायला मिळाली.

मानाचे गणपती, दगडूशेठ गणपती यांचं वेळेत विसर्जन पार पडलं मात्र पुण्यातील महत्वाच्या गणपती मंडळांनी उशीर केल्याने यंदा मिरवणूक खोळंबली लवकर मिरवणूक संपवण्याचा दावा मात्र फोल ठरला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने