Pune Uni : एस. एम जोशी कॉलेज मधील विद्यार्थीच्या निकालामध्ये गोंधळ; विद्यार्थी नेते राहुल ससाणे व ओंकार बेनके यांनी सोडवला तत्काळ

ब्युरो टीम: एस. एम जोशी कॉलेज हडपसर पुणे येथील MSc Analytical chem.प्रथम वर्षातील २१ विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये येऊन डॉ.महेश काकडे (संचालक - परीक्षा व मूल्यमापन मंडळ) यांची भेट घेतली व निकालामध्ये झालेला गोंधळ सरांसमोर मांडला. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे सदस्य राहुल ससाणे व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष ओंकार बेनके यांनी सकाळपासून या विद्यार्थी प्रश्नःचा पाठपुरावा केला.

अनेक विद्यार्थ्यांच्या निकालावर सेक्शन B चे मार्क दाखविले जात नव्हते. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल फेल आले होते. हे सर्व विद्यार्थी कॉलेजमधील कर्मचाऱ्यांशी सातत्याने संपर्क करत होते. परंतु कॉलेज त्यांना जेएसपीएम या ठिकाणी चौकशी करायला सांगत होते . त्या ठिकाणी देखील त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळणे शेवटी आज विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या माध्यमातून डॉ. महेश काकडे यांची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सरांच्या लक्षात आणून दिला असता संचालकांनी तात्काळ कारवाईची आदेश देऊन हा प्रश्न निकाली लावला. लवकरच सर्व निकाल दुरूस्त करून अपलोड केले जातील. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. संदिप पालवे सर उपस्थित होते. 





0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने