ब्युरो टीम : पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित असलेल्या बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कमवा व शिका ही योजना राबवून गोर - गरिब समाजाला शिक्षित करण्याचे काम केले असे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती होती . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिकृतपणे कर्मवीराची जयंती साजरी केली गेली नाही . विद्यापीठाच्या एका कर्मचाऱ्यांला याबाबत माहिती विचारली असता त्यांच्याकडून असे सांगण्यात आले की ' कोणत्या महापुरुषांची जयंती साजरी करायची त्यांची एक सुची महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेली आहे. त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाचा समावेश नाही त्यामुळे आपण जयंती साजरी केली नाही करत नाही. व विद्यार्थी विकास मंडळाकडे त्याविषयीची सर्व जबाबदारी दिलेली आहे .
त्यानंतर मा. संचालक यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता त्यांनी सांगितले की " ३० ते ३५ विद्यार्थीच्या उपस्थित कमवा व शिकाच्या ऑफिसमध्ये जयंती साजरी केली . यावर कार्यक्रमाचे फोटो पाठवा असे विचारले असता त्यांनी नकार दिला. " एक तर विद्यापीठ प्रशासन अधिकृतपणे कर्मवीराची जयंती साजरी करत नाही. विद्यार्थी विकास मंडळाकडे जबाबदारी देऊन मोकळे होते. आणि या दोन्हीकडून अधिकृत परिपत्रक काढले गेले नाही. आणि दुसरीकडे महाराष्ट्र शासनाच्या सुचीमध्ये कर्मवीराच्या नावाचा समावेश नाही. ही बाब अतिशय गंभीर असून यावर आपण सर्वांनी गांभीर्यपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.
ज्या महापुरुषाने रयत व कमवा व शिका योजनेच्या माध्यमातून तुमच्या माझ्यासारखे लाखो विद्यार्थी घडवले. ज्या विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेसाठी चालू वर्षी ५ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्याचं विद्यापीठात प्रशासनाकडून अधिकृतपणे या महामानवाची जयंती साजरी केली जाऊ नये यासारखी दुसरी शोकांतिका ती कोणती ...
प्रश्न -
१) जयंतीचे अधिकृत परिपत्रक का काढले नाही ?
२) कोणतेही परिपत्रक न काढता
मोजक्याच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेणे योग्य आहे का ?
३) महाराष्ट्र शासनाच्या जयंती साजरी करण्याच्या महापुरुषांच्या सुचीमध्ये कर्मवीराच्या नावाचा समावेश नसणे ही लाजीरवाणी बाब आहे की नाही ?
४) या सर्व विस्कळीत कार्यप्रणालीमध्ये बदल होणे अपेक्षित आहे की नाही ?
टिप्पणी पोस्ट करा