ब्युरो टीम: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती व इतर समविचारी संघटनांच्या वतीने विद्यार्थी प्रश्नांवर बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले होते . यामध्ये प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला वसतिगृह मिळाले पाहिजे.
2 वसतिगृह वाटप व कोटा वर्गीकरणामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या वसतिगृह प्रमुख विकास मठे यांची हकालपट्टी करण्यात यावी.
3)मुलींना धमकी देणाऱ्या ओएसडी (OSD) संगीता देशपांडे यांची हकालपट्टी करावी
या प्रमुख मागण्या घेऊन आंदोलन चालू होते . या आंदोलनाची दखल घेत *मा कुलगुरू डॉ सुरेश गोसावी सरांनी दुपारी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी भेट देऊन विद्यार्थीशी सकारात्मक संवाद साधला* आणि आश्वासन दिले की प्रशासन आपल्या प्रमुख तीन मागण्यावरती अत्यंत गंभीर असून आम्ही या सर्व मागण्या येत्या चार दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देत आहोत. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की " विद्यापीठ प्रशासन गरजू विद्यार्थ्यांना वसतिग्रह देण्यासाठी प्रयत्नशील आहे. पहिल्या टप्प्यात सर्व मुलांनी प्राधान्याने वसतिग्रह दिले जाईल व मुलांसाठी लवकरच 5 नंबर वसतिग्रह चालू करण्यात येत आहे तसे चलन काही मुलांना पाठविण्यात आले आहेत" त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या दरम्यान मा कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी देखील आंदोलन स्थळी भेट दिली व मागण्या पूर्ण करण्यासंबंधीचे लेखी आश्वासन पत्र विद्यार्थींना दिले*. सर्व विद्यार्थी व संघटना प्रतिनिधींशी संवाद करून त्या पत्राचा कृती समितीने स्वीकार केला आहे. आणि काही काळासाठी विद्यापीठ प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. जर विद्यापीठ प्रशासनाने येत्या चार दिवसांत सर्व मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन कृती समिती व इतर समविचारी संघटनांच्या वतीने करण्यात येईल व त्यानंतर होणाऱ्या आंदोलन व परिणामास कुलगुरू , कुलसचिव व विद्यापीठ प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. विद्यापीठातील वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थी तसेच सामाजिक व राजकीय संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यामध्ये विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, युवासेन , शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस , छात्रभारती , जनता दल युनायटेड, महाज्योती विद्यार्थी संघर्ष समिती, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती , युवक काँग्रेस, NSUI, युक्रांद , लोकायत, नव समाजवादी पर्याय , RPI ( विद्यार्थी आघाडी ) , स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्ड इ. संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सोबतच माजी सिनेट सदस्य संतोष ढोरे यांनी देखील आंदोलक विद्यार्थींना भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा दिला होता.
टिप्पणी पोस्ट करा