पुण्यात (Pune) भरलेल्या देशातील सर्वात मोठ्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद!

 


माजी आमदार स्व. विनायक आबा निम्हण यांच्या ६० व्या जयंती निमित्ताने सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत कार्यसम्राट महाआरोग्य शिबिर 6 ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आले होते. माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या नेतृत्वात संपूर्ण टीम हे शिबिर यशस्वी करण्यासाठी झटत आहे.

'एकच ग्वाही तपासणीपासून शस्रक्रियेपर्यंत सर्वकाही' या ध्येयाने काम करण्यासाठी एक महिना अगोदरपासूनच प्राथमिक तपासणीची सुरुवात करण्यात आली होती. त्यानुसार ७० हजार रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. या पुढील टप्प्यात प्राथमिक तपासणीत समोर आलेल्या नागरिकांच्या शस्त्रक्रिया पुणे शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहेत.

स्व. आबांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्यांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते. याच सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना आमदारकीची संधी दिली होती. त्यानंतरही स्व. आबांनी कधी सर्वसामान्य जनतेच्या सुखदुखात सहभागी होणे सोडले नाही. या नागरिकांसाठी त्यांनी विधानसभेत आवाज उठवत अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यामुळेच ते मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण पुणे शहरात कार्यसम्राट आमदार म्हणून प्रसिद्ध होते. परंतु नियतीच्या मनातील खेळ कोण ओळखू शकला आहे. स्व. विनायक आबा गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका आल्याने आबा आपल्याला सोडून गेले. सर्वसामान्यांचा तारणहार गेल्याचे दुख सामान्य जनतेसह अनेक मान्यवर नेत्यांना झाले. महानगरपालिकेने आयोजित केलेल्या शोकसभेसाठी अनेक नेत्यांनी त्यांच्या बद्दल बोलताना आबांचे सर्वच पक्षातील नेत्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण स्वभावाचे कथन केले. 

सर्वसामान्य जनतेच्या सेवेचा वसा पुढे चालविण्याचे काम त्यांचा मुलगा सनी निम्हण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जाताना सनी निम्हण यांनी सर्वसामान्य रुग्णांसाठी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलं आहे. स्व. आबांवर असलेल्या प्रेमाखातर व त्याचा वारसा पुढे चालवणाऱ्या सनी निम्हण यांना पाठबळ देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार अशी दिग्गज नेत्यांची मांदियाळी कार्यक्रमासाठी उपस्थित होती. या सर्व नेत्यांनी आपल्या भाषणात महाआरोग्य शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सनी निम्हण यांचे कौतुक केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने