ब्युरो टीम: सिंधुदुर्ग भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली हे जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर आता त्याच्या सुपुत्राला पक्षाने प्रदेश स्तरावर काम करण्याची संधी दिली असून प्रथमेश तेली यांना थेट प्रदेश उपाध्यक्ष पदी नेऊन बसविल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या नियुक्तीचे पत्र गुरूवारी तेली यांना प्राप्त झाले आहे.
राजन तेली यांना जिल्हाध्यक्ष पदावरून दूर करत भाजपने प्रभाकर सावंत यांना संधी दिली होती. त्यानंतर राजन तेली यांनी सावंतवाडी विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले होते. अलिकडेच भाजपची जिल्ह्याची जॅम्बो कार्यकारणी जाहीर झाली. त्यात तेली यांची निमंत्रक पदावर बोळवण करण्यात आली होती. तरीही तेली हे पक्ष कार्यात अग्रभागी होते.
दरम्यान आता भाजपकडून तेली याच्या सुपुत्राला प्रदेशस्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. प्रथमेश तेली हे सावंतवाडी मतदारसंघात वडिलांसोबत पक्षीय काम करत व्यवसाय सांभाळत होते. त्यातूनच त्यांनी लोकसंपर्क व विशेषतः युवकांचा संपर्क वाढवला. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रथमेश यांची भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली.
टिप्पणी पोस्ट करा