Rushi Sunak: आज मोदींची सुनक यांना जादू की झप्पी; उद्या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक अक्षरधाम मंदिरला भेट देणार,

 

ब्युरो टीम: राजधानी दिल्ली येथे शनिवारपासून सुरू झालेल्या G20 परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक शुक्रवारी भारतात दाखल झाले. पत्नी अक्षता मूर्तीसह ऋषी सुनक यांचे पालम विमानतळावर केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे व भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी स्वागत केले.

येथील विमानतळावर ऋषी सुनक यांच्या स्वागतासाठी आयोजित पारंपरिक नृत्याला ब्रिटनच्या पाहुण्यांनी दाद दिली. तर, चौबे यांनी जय सियाराम म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सुनक यांनी मी हिंदू असल्याचा आणि भारतीय वंशाचा असल्याचा मला अभिमान असल्याचंही म्हटलं होतं.

केंद्रीय मंत्री चौबे यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना जय सियाराम म्हणत त्यांच्या पूर्वजांच्या भूमीवर अभिनंदन केले. तसेच, रुद्राक्ष, श्रीमद् भगवतगीता आणि हनुमान चालिसाही भेट दिली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जादू की झप्पी देत भारताचे जावई असलेल्या ऋषी सुनक यांचं स्वागत केलं. सुनक हे आपल्या पत्नीसह रविवारी सकाळी अक्षरधाम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. पत्नी अक्षतासह ते सकाळी ६.३० ते ७.३० या वेळात मंदिरात असतील. स्वामी नारायण मंदिराचे पुजारी दोघांचेही स्वागत करतील. मुख्य मंदिराच्या पाठिमागील मंदिरात ते जलाभिषेकही करू शकतात.

दरम्यान, ऋषी सुनक यांच्या भेटीपूर्वी मंदिराच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. डीसीपी आणि ज्वाईंट सीपींकडून येथील मंदिर परिसरात मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

मोदींची सुनक यांना जादू की झप्पी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारत मंडपम येथे G-20 मध्ये उपस्थित असलेले सर्व देशांचे प्रमुख आणि पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी ब्रिटीश पंतप्रधान आणि 'भारताचे जावई' ऋषी सुनक यांचे मनापासून स्वागत केले. जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान शुक्रवारी दिल्लीत पोहोचले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अक्षता मूर्ती या देखील आल्या. मोदी यांनी आज ऋषी सुनक यांना हस्तांदोलन करत अभिवादन केले आणि मिठी मारली. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये काही क्षण चर्चा झाली.

सुनक 'भारताचे जावई'

ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान, सुनक यांनी अनेकदा आपल्या हिंदू मुळांचा उल्लेख केला आहे आणि त्यांना याचा अभिमान असल्याचे सांगितले आहे. त्यांची पत्नी अक्षता मूर्ती ही इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. ती नारायण मूर्ती यांची कन्या. या कारणास्तव सुनक यांना भारतीय जावई असेही म्हणतात. "मी कुठेतरी पाहिले आहे की मला भारताचा जावई म्हणतात. मला आशा आहे की ते प्रेमाने म्हटले जाते," असे सुनक यावर बोलताना म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने