ब्यूरो टीम : मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी खारे शेंगदाणे हा उत्तम पर्याय आहे. शेंगदाणे प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. पण नेहमीच बाहेरचे शेंगदाणे-चणे खाल्ल्यामुळे तब्येतीला धोका पोहोचू शकतो. त्यापेक्षा घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही नमकिन शेंगदाणे बनवू शकता.
१) खारे शेंगदाणे बनवण्यासाठी सगळ्यात आधी पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळ्यानंतर त्यात शेंगदाणे घाला. शेंगदाणे २ ते ३ मिनिटं या पाण्यात ठेवल्यानंतर बाहेर काढा.
२) एका स्वच्छ, कोरड्या कापडावर सुकवण्यासाठी ठेवा. त्यानंतर एका कढईत ३ ते ३ वाटी मीठ घाला.
३) मीठ गरम झाल्यानंतर त्यात शेंगदाणे घालून ते भाजून घ्या. भाजलेले शेंगदाणे झारा किंवा चमच्याच्या साहाय्याने वर काढून घ्या. तयार आहेत खारे शेंगदाणे.
४) मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. शेंगदाणे तुम्हाला बाहेरून विकत घ्यावे लागणार नाही. या पद्धतीने तुम्ही चणेसुद्धा घरी बनवू शकता.
टिप्पणी पोस्ट करा