Shankar Movie: आदि शंकराचार्य यांच्यावर आधारित चित्रपटाची घोषणा; आशुतोष गोवारीकर यांनी केली शेअरकेले पोस्टर

 

ब्युरो टीम:  नुकतीच आशुतोष गोवारीकर (यांनी त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याच्या नव्या चित्रपटाचं नाव 'शंकर' असं आहे.बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर  हे त्याच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. नुकतीच आशुतोष यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांच्या या नव्या चित्रपटाचं नाव 'शंकर'  असं आहे . आशुतोष यांनी ट्विटरवर 'शंकर' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

आशुतोष यांनी 'शंकर' चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आदि शंकराचार्य यांच्या जीवनावर सिनेमॅटिक सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. "शंकर", आचार्य शंकर सांस्कृतिक एकता न्यास आणि एकात्मधाम यांच्या सहकार्याने.'  आशुतोष यांनी शेअर केलेल्या 'शंकर' या चित्रपटाच्या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

'शंकर' या चित्रपटाची अजून रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आशुतोष गोवारीकर यांची  'काला पानी' ही वेब सीरिज देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या सीरिजमध्ये प्रेक्षकांना आशुतोष यांचा अभिनय बघायला मिळणार आहे. 'काला पानी' या सीरिजमध्ये  आशुतोष गोवारीकरसोबत, अमेय वाघ, सुकांत गोयल, विकास कुमार, अरुशी शर्मा, राधिका मेहरोत्रा, चिन्मय मांडलेकर आणि पूर्णिमा इंद्रजीत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

आशुतोष गोवारीकर यांचे चित्रपट

जोधा, अकबर, स्वदेस आणि लगान यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी (Ashutosh Gowariker) केलं आहे. आशुतोष यांनी व्हेंटिलेटर या चित्रपटामध्ये देखील काम केलं. हा चित्रपट 2016 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्यांनी दिग्दर्शित केलेल्या शंकर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.    

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने