Shivrayancha Chhava : दिग्पाल लांजेकर.नवीन चित्रपट ‘शिवरायांचा छावा’; छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट

 

ब्युरो टीम ; लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवरायांचा छावा’ सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठा साम्राज्याची शौर्यगाथा दाखवणारा ‘शिवरायांचा छावा' हा सिनेमा आहे.

 फक्त तरुण पिढीच नव्हे तर सर्व वयोगटातील प्रेक्षक वर्ग सध्या ऐतिहासिक सिनेमा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी सिनेमागृहाकडे वळले आहेत. त्याचं कारण म्हणजे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. ‘सुभेदार’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ आणि ‘फत्तेशिकस्त’ यांसारख्या भव्य ऐतिहासिक सिनेमांसाठी दिग्पाल लांजेकर ओळखले जातात. पुरस्कार विजेते दिग्पाल लांजेकर आणि ‘मल्हार पिक्चर कंपनी’ यांनी आता आणखी एका ऐतिहासिक सिनेमाची घोषणा केली आहे. ‘शिवरायांचा छावा’ या आगामी ऐतिहासिक सिनेमाचे मोशन पोस्टर त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. मराठा साम्राज्याची शौर्यगाथा दाखवणारा ‘शिवरायांचा छावा’ हा सिनेमा नवीन वर्षात, म्हणजेच 16 फेब्रुवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

“छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर साकारायला मिळणं हे माझं परमभाग्यच आहे असं मी मानतो”, या शब्दांत दिग्पाल लांजेकरांनी ‘शिवरायांचा छावा’चं मोशन पोस्टर प्रदर्शित करताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या. या सिनेमाविषयी बोलताना ‘मल्हार पिक्चर कंपनी’ यांनी म्हटलं, “ऐतिहासिक सिनेमा बनवणं हे आमचं कायमच स्वप्नं होतं आणि त्यातही महाराष्ट्राचे लाडके युवराज छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा मांडता येणं यापेक्षा दुसरं भाग्य काय असेल. हा सिनेमा करताना घेतला गेलेला अतिशय उत्तम आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे दिग्पाल लांजेकर यांची लेखक आणि दिग्दर्शक म्हणून केलेली निवड. या ऐतिहासिक कथेच्या दिग्दर्शनासाठी त्यांच्याशिवाय दुसरं कोणतं नाव आमच्या डोक्यात आलंच नाही. त्यांचा इतिहासाचा असलेला अभ्यास आणि त्यांची अभ्यासू वृत्ती ही खरोखर वाखणण्याजोगी आहे.”

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने