ब्युरो टीम: आशिया कप 2023 मधील टीम इंडिया आणि नेपाळमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 10 विकेट्सने विजय मिळवला. आशिया कपमध्ये टीम इंडियाने विजयाचा श्रीगणेशा केला. नेपाळ संघाने प्रथम फलंदाजी करताना 230 धावा केल्या होत्या.
मात्र त्यानंतर पाऊस आल्याने 23 ओव्हरमध्ये 148 धावांचं लक्ष्य टीम इंडियाला देण्यात आलेलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी नाबाद अर्धशतके करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडियाने सुपर 4 मध्ये जागा मिळवली आहे. या सामन्यात युवा खेळाडू शुबमन गिल याने 67 धावांची नाबाद खेळी करत एका मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
शुबमन गिलचा दमदार विक्रम
शुबमन गिल याने नाबाद 67 धावांच्या खेळीसह त्याने वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 1500 धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. गिलने वनडेच्या 29 डावांमध्ये आपल्या 1500 धावा पूर्ण केल्यात. त्याआधी हा विक्रम श्रेयस अय्यरच्या नावावर होता. श्रेयसन 34 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. मात्र आता गिलने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
शुबमन गिल याने 31 जानेवारी 2019 मध्ये वन डे क्रिकेटमध्ये डेब्यूमध्ये पदार्पण केलं होत. नेपाळविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो 28 एकदिवसीय सामने खेळला होता. या कालावधीत त्याने 60.29 च्या सरासरीने आणि 102.40 च्या स्ट्राईक रेटने 1,447 धावा होत्या. 18 जानेवारी 2023 मध्ये गिलने द्विशतक झळकवलं होतं.
नेपाळ क्रिकेट टीम प्लेइंग इलेव्हन | रोहित पौडेल (C), कुशल भुर्तेल, आसिफ शेख (W), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलशन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी आणि ललित राजबंशी.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (C), शुबमन गिल, ईशान किशन(W), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
टिप्पणी पोस्ट करा