ब्युरो टीम; भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याने क्रिकेच जगतात आपली वेगळी ओळख तयार केलीये. गडी एकदा सेट झाला की विषयच संपला, बॉलरने कुठेही बॉल टाकला तर हा गडी आस्मान दाखवल्याशिवाय राहत नाही. अल्टी, पल्टी आणि पिचवर खाली पडून कडक शॉट खेळणाऱ्या सूर्याची दहशतच टी-20 क्रिकेटमध्ये झाली आहे. सूर्यकुमार यादवने टी-20 क्रिकेटमध्ये काही तगडे रेकॉर्ड केले आहेत. आज सूर्याचा वाढदिवस असून त्याच्या या तगड्या रेकॉर्डवर एक नजर माराच.
सूर्यकुमारने आपल्या अंतरगी क्रिकेटिंग शॉट्समुळे अनेक सामने एकहाती जिंकले आहेत. टी- 20 क्रिकेटमध्ये 52 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 12 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला आहे. विराट कोहली या यादीमध्ये 15 पुरस्कारांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
सूर्यकुमार यादव हा टी-2- मधील सर्वात विध्वंसक फलंदाज मानला जातो. तो एकाच चेंडूवर अनेक शॉट्स खेळू शकतो. त्याने 53 सामन्यात 172.70 च्या स्ट्राईक रेटने 1841 धावा केल्या आहेत. तो केवळ 1000 धावांच्या बाबतीतच नाही तर करिअरच्या स्ट्राइकरेटच्या बाबतीतही अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे.
एकाच डावात सूर्याने सर्वाधिक चौकार मारले आहेत. 10 जुलै 2022 रोजी त्याने 117 धावा केल्या होत्या. या इनिंगमध्ये त्याने 14 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज आहे. सूर्याने 31 डावांमध्ये हा कामगिरी केली आहे. या यादीत विराट पहिल्या स्थानी असून त्याने 27 तर दुसऱ्या स्थानी असलेल्या के. एलने 29 डावांमध्ये कामगिरी केलीये.
टी-20 क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानी फलंदाजीला येत 111 धावांची खेळी करणारा सू्र्या एकमेव खेळाडू आहे. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
टिप्पणी पोस्ट करा