ब्युरो टीम : जगभरासह भारतातही थायरॉईडची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. ही आपल्या शरीरातील अशी एक ग्लँड किंवा ग्रंथी असते, जी हार्मोन्सचे उत्पादन करण्यात काम करते आणि मेटाबॉलिज्म नियंत्रित करते.
याच्या कमतरतेमुळे किंवा त्याची जास्त वाढ झाल्यामुळे शरीरातील वजन कमी होते किंवा वाढू लागते. वैद्यकीय भाषेत याला हायपोथायरॉइडीझम असे म्हटले जाते. मात्र डाएट, योग्य आहार, व्यायाम किंवा इतर उपायांनी ते मॅनेज करता येते. थायरॉईडमुळे कर्करोगाचा धोकाही उद्भवू शकतो
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, थायरॉईड ग्लँडमधील पेशी या सामान्य स्तरापेक्षा जास्त वाढू लागल्या तर कॅन्सरची सुरूवात असू शकते. थायरॉईडची पातळी वाढण्यापासून रोखण्यासाठी किंवा ती मॅनेज करण्यासाठी, खाली नमूद केलेले रुटीन फॉलो करू शकता.
थायरॉईड का होतो आणि त्याची लक्षणे काय असतात ?
खाण्यात आयोडिनची कमतरता, मेंटल स्ट्रेस आणि हार्मोनल असंतुलन यामुळे थायरॉईडचा त्रास किंवा आजार होऊ शकतो. आधी ही समस्या वयाच्या 50 व्या वर्षानंतर दिसायची. पण आता 30 व्या वर्षीही लोकांना थायरॉईड झाल्याचे दिसून येते. महिलांमध्ये या त्रासाचे प्रमाण जास्त असते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मानेभोवती गाठ जाणवणे, अन्न गिळताना त्रास होणे, घशात दुखणे, वजन झपाट्याने कमी होणे किंवा वाढणे, खोकला आणि घशात सूज येणे या समस्या थायरॉईडच्या लक्षणांमध्ये समाविष्ट आहेत.
थायरॉईड मॅनेज करण्यासाठी –
पोषक तत्व असलेल्या आहाराचे सेवन करावे. तुम्ही जो आहार घ्याल त्यामध्ये फायबर, प्रोटीन्स आणि मिनरल्सचा समावेश असावा.
दररोज व्यायाम करा. रोज व्यायाम केल्याने थायरॉईडची लक्षणे कमी होऊ शकतात. यामुळे मेटाबॉलिज्म आणि एनर्जी बूस्ट होते. तसेच स्नायूही मजबूत होतात.
ॲक्टिव्ह रहा. दिवसभर व्यस्त रहाल अशा कामांचा रुटीनमध्ये समावेश करा. आरोग्याशी संबंधित समस्यांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी, दिवसभर ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा.
स्ट्रेस घेऊ नका. बिझी लाइफ किंवा इतर कारणांमुळे स्ट्रेस येणे नॉर्मल आहे. मानसिक ताण-तणाव मॅनेज करण्यासाठी रोज मेडिटेशन, योगासने आणि श्वसनाचे व्यायाम करावेच. स्ट्रेस घेतल्यामुळे आपले मेटाबॉलिज्म कमकुवत होते.
पुरेशी झोप घ्या. 7 ते 8 तासांच्या झोपेने थायरॉईड ग्रंथी हार्मोन्स सोडण्यास आणि त्या रेग्युलेट करण्यास सक्षम असते,हे तुम्हाला माहित आहे का ? रात्रभर पुरेशी झोप घेतल्याने दिवसभर फ्रेश वाटते. थकवा दूर होतो.
थायरॉईड मॅनेज करण्यासाठी तुम्ही हे रुटीन फॉलो करू शकता, पण जर त्याची पातळी वाढली तर वेळीच डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मनाप्रमाणे उपाय केल्यामुळे फायद्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा.
टिप्पणी पोस्ट करा