Anamprem : अंधाच्या जीवनात पांढरी काठी ही स्वावलंबनाची निशाणी; अनामप्रेम चे अध्यक्ष इंजि.अजित माने यांची जनजागृती रॅली

 

ब्युरो टीम : अंध व दिव्यांग यांच्या जीवनात आधार साहित्य यांचे महत्व अनन्य साधारण आहे. जीवनात अनेक अडथळे पार करताना पांढरी काठी अंधाना आधार देते. मोबिलिटी साठी पांढरी काठी हाच एकमेवाद्वितीय आधार आहे.अंधाच्या जीवनात पांढरी काठी ही स्वावलंबनाची निशाणी आहे, असे प्रतिपादन अनामप्रेम चे अध्यक्ष इंजि.अजित माने यांनी आज केले. आज अनामप्रेम संस्थेच्या वतीने अंध-दिव्यांग यांच्या जीवनाची आधार असणारी पांढरी काठी जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी श्री.माने बोलत होते. श्री.माने पुढे म्हणाले की, अनामप्रेम मधील सर्व दिव्यांग यांनी विशेषतः अंध यांनी पांढरी काठी सदैव वापरावी, ही काठी वापरत असताना मनात कोणताही न्यूनगंड बाळगू नये. समाजात रस्त्यावर असे पांढरी काठी घेऊन चालताना अंधजन दिसल्यास त्यांना मदत करावी, असे आवाहन श्री.माने यांनी केले.

        आज जागतिक पांढरी काठी दिन आहे, त्या निमित्त अनामप्रेम संस्थेच्या वतीने अहमदनगर शहरात आज सायंकाळी 4 ते 6 यावेळेत दिव्यागांच्या विषयीच्या जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. समाजातील अंध व्यक्तींना जीवन जगत असताना चलनवलन क्षमता (मोबिलिटी)करण्यासाठी पांढरी काठी आवश्यक असते. पांढरी काठी म्हणजे अंधाचा तिसरा डोळा आहे. यामुळे या पांढऱ्या काठीचे समाजात महत्व पटवून देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या समारोप प्रसंगी रामेश्वर फटांगडे यांनी पांढऱ्या काठीचे महत्व सांगितले.पांढऱ्या काठीचे भाग व महत्व यावेळी सर्व उपस्थित दिव्यांग-अंध यांनी श्री.फटांगडे यांनी सांगितले.  अंधाच्या जीवनात पांढऱ्या काठीमुळे आत्मविश्वास वाढल्याचे स्वानुभव राहुल पेटारे, शुभम राऊत,करिष्मा कौर यांनी उपस्थित यांना सांगितले.

ही रॅली आज दुपारी 4 वाजता गांधी मैदान येथून उपस्थित सर्व अंध-दिव्यांग यांना घेऊन चितळे रोड,दिल्ली गेट, निलक्रांती चौक, न्यू आर्ट कॉलेज रोड, चौथे शिवाजी महाराज पुतळा,लाल टाकी अशी रॅली अंध-अपंग असा मार्ग या रॅलीत सहभागी दिव्यांग यांनी पूर्ण केला.

यावेळी या रॅलीस नागरिकांनी सहकार्य करून या रॅलीला मदत केली. या रॅलीत अंधाच्या जीवनाबाबत, आव्हानांबाबत  जनजागृती करणारे घोषणा फलक अंधांच्या हातात होते. सहभागी अंध यांनी " तुमच्या गाड्याथांबवा, अंधाना पुढे जाऊ द्या..!", " पांढरी काठी, अंधासाठी."  अशा घोषणा देत रॅलीत सहभागी होते  या रॅलीस अनामप्रेम चे  डॉ.बापूसाहेब कांडेकर, डॉ.रवींद्र सोमाणी, उद्योजक अविनाश बोपर्डीकर, डॉ.मेघना मराठे, निवृत्त सनदी अधिकारी नितीन थाडे यांनी रॅलीला शुभेच्छा आणि पाठिंबा दिला. अभय रायकवाड, सामाजिक कार्यकर्ते उत्कर्ष गीते यांनी या रॅलीत उपस्थित राहत अंधाना मार्गिकेचे मार्गदर्शन केले.  या रॅली चे आयोजन उमेश पंडुरे,विष्णू वारकरी,राहुल खिरोडे,अमृत भुसारी, रामेश्वर फटांगडे, अक्षय राऊत, विशाल निंबाळकर, प्रतीक्षा मुंतोडे, पल्लवी मकासरे या दिव्यांग व दिव्यांग मित्र  यांनी केले होते.अंध दिव्यांग इतक्या मोठ्या संख्येने नगर शहरातील मुख्य रस्त्याने रॅलीत सहभागी झाल्याने दिव्यांग यांचा आत्मविश्वास वाढला.  रॅली पाहणाऱ्या नागरिकांना पांढऱ्या काठीचे महत्व समजल्याने रॅलीला विना अडथळा रस्ता देण्यात आला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने