Anamprem : दिव्यांग पुनर्वसनाचे प्रकल्प पाहण्याची संधी; सामाजिक पर्यटनासाठी दर रविवारी अनामप्रेम ची बस सज्ज

 

ब्युरो टीम : अहमदनगर येथील अनामप्रेम संस्थेच्या वतीने नगर तालुक्यातील निंबळक इसळक गाव परिसरातील संस्थेचे विविध दिव्यांग पुनर्वसनाचे प्रकल्प पाहण्याची संधी नगरकर यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. दर रविवारी नोंदणी केलेल्या नगरकर यांना दिल्लीगेट व प्रोफेसर कॉलनी चौक येथून निंबळक येथील प्रकल्प बस ने जाऊन पाहता येणार आहेत. 4 तासाच्या कालावधीत प्रकल्प दर्शन तसेच सर्व दिव्यांग यांना भेटीची सोय करण्यात आली आहे. दिव्यांग यांच्याशी गप्पा मारणे, त्यांना विविध विषयांची माहिती देणे या सहलीत सहभागी नगरकर यांना आदी उपक्रम राबविता येणार आहेत. सहभागी नगरकर यांना वनभोजन व्यवस्था यावेळी करता येईल. संस्थेच्या वतीने मत्स्य मसाज, गायींना चारा देणे,सांकेतिक भाषा व ब्रेल वर्ग यांची माहिती मिळणार आहे. ज्यांना अनामप्रेम संस्थेला मदत करायची आहे, ते प्रत्यक्ष येऊन संस्थेत मदत करू शकणार आहेत. येत्या 15 ऑक्टोबर 2023 पासून दर रविवारी सकाळी 10 ते 2 यावेळेत नोंदणीकृत नगरकर यांना मोफत सामाजिक पर्यटन करिता  बसने घेऊन जाणे व आणून सोडणे अशी व्यवस्था अनामप्रेम संस्थेमार्फत करण्यात आली आहे. तरी जास्तीतजास्त सामाजिक संवेदनशील नगरकर,सामाजिक कार्यकर्ते यांनी यात सहभागी व्हावे,संस्था कामाला अनेक हात जोडून द्यावेत असे आवाहन संस्थेचे इंजि.अजित माने, डॉ.बापूसाहेब कांडेकर, डॉ.रवींद्र सोमाणी,उद्योजक अविनाश बोपर्डीकर, डॉ.मेघना मराठे, स्वाती रानडे , नितीन थाडे ,राधा मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे. सामाजिक पर्यटन करिता नोंदणीसाठी 7350013802, 9011020174, 7350013803, 7350013806 यावर संपर्क साधावा.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने