A.P.J. Abdul Kalam : मिसाईल मॅन- डॉ. अब्दुल कलाम

 

भारत देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. ब्रिटिशांचा युनियन जॅक ध्वज उतरवला व भारताचा तिरंगा डौलाने फडकला. आजही अनेक लोक विविध क्षेत्रात महान कार्य करुन जगात भारत देशाचे नाव उंचावत आहेत.  असाच एक कोहिनूर हिरा या भारतभूमीत जन्मला व ज्याने आपल्या महान कर्तृत्वाने भारत देशाचा ध्वज जगात स्वाभिमानाने उंचच उंच फडकवला. अशा या महान व्यक्तीचे नाव होते ए.पी.जे. अब्दुल कलाम. आज १५ ऑक्टो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती. त्यानिमित्त त्यांनी केलेलें महान कार्याचा घेतलेला आढावा. भारताचे "मिसाइल मॅन" म्हणून ज्यांना जग ओळखते त्या अब्दुल कलामांचा जन्म १५ आँक्टो १९३१ रोजी तमिळनाडू मधील रामेश्वरम येथे झाला. बालपणापासूनच त्यांचे जीवन हे संघर्षात गेले. घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्याने शाळेची फि भरण्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रे घरोघरी वाटण्याचे काम केले. शाळेत त्यांची तल्लख बुद्धिमत्ता होती. पुढे कलाम हे एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास करू लागले. अब्दुल कलाम हे प्रामणिक व उदार मनाचे होते. ते पुढे "इस्रो" येथे शास्त्रज्ञ म्हणून काम करू लागले. त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून डी. आर.डी. ओ. मधे भरीव काम केले. अणुचाचण्यात त्यांनी महत्वपुर्ण भूमिका बजावली. ते "इस्रो" प्रकल्प प्रमुख होते. रोहिणीची यशस्वी चाचणी त्यांच्याच नेतृत्वाखाली पार पडली. कलामांनी व्याख्यानातून देशसेवेसाठी सशक्त युवा पिढी निर्माण केली. त्यांनी "अग्नीपंख" सारखे अनेक पुस्तके लिहली. वाचनाची प्रचंड आवड असलले कलाम  हे भारताचे "राष्ट्रपती"बनले. राष्ट्रपती काळात त्यांनी राजकारण न करता नेहमी जनसेवा व देशसेवा केली.राष्ट्रपती असताना त्यांनी देश हिताचे अनेक महत्वपुर्ण निर्णय घेवुन देशाचा विकास साधला. जात, धर्म,प्रांत असा कोणताच भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. कलामांनी नेहमीच मानवतेची शिकवण समाजाला दिली.

त्यांचा मृत्यू हि विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच झाला. कायमचं भारतमातेची सेवा हेच उदिष्ट ठेवून प्रामाणिकपणे कार्य करणारे कलामांचे विचार आजच्या पिढीला नक्कीचं दिशादर्शक ठरतील. त्यांचे कार्य पाहून सरकारने त्यांना पदभूषण, पद्मविभुषण, भारतरत्न सारखे अनेक पुरस्कार दिले.

खरचं आज भरकटलेल्या समाजाला गरज आहे अब्दुल कलाम यांच्या विचारांची.आज समाजात जाती, धर्म भेद प्रचंड वाढले आहेत. आज समाजात भ्रष्टचार,अत्याचार वाढत आहेत. माणुसकी संपत चालली आहे. युवा पिढी व्यसनात व  मोबाईलच्या विळख्यात अडकत चालली आहे. समाजानी अब्दुल कलाम यांचे विचार अंगी जोपासले तर आत्महत्या थांबतील व समाजातील भष्ट्राचार, भेदाभेद हे नष्ट होईल. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या महान कार्यास विनम्र अभिवादन.

 लेखक- महेंद्र मिसाळ (सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने