ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिमान असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधानांनी ट्विट करून भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचं कौतूक केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चांगली कामगिरी केली आहे. देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं पीएम मोदी यांनी म्हटले आहे. प्रत्येक पदक कठोर परिश्रम आणि आवड दर्शवते. असं मोदींनी म्हटले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच नवा इतिहास लिहिला आहे. भारताने आतापर्यंत 74 पदके जिंकली आहेत. यामध्ये 16 सुवर्ण, 27 रौप्य आणि 31 कांस्यपदकांचा समावेश आहे. 2018 आशियाई स्पर्धेत भारताने एकूण 70 पदके जिंकली गेली, ज्यात 16 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. तिरंदाजीच्या कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेत भारताने 16 वे सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत त्याने दक्षिण कोरियाचा पराभव केला.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी
71 पदक जिंकत भारताने आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी म्हटलं आहे.
रँकिंगबद्दल बोलायचे झाले तर भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. यजमान देश चीन पदकतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. चीनने एकूण 304 पदके जिंकली आहेत. यामध्ये 166 सुवर्ण, 91 रौप्य आणि 47 कांस्य पदकांचा समावेश आहे. जपान 135 पदकांसह (34 सुवर्ण, 49 रौप्य आणि 52 कांस्य) दुसऱ्या स्थानावर आहे. कोरियाचे प्रजासत्ताक १४२ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 32 सुवर्ण, 44 रौप्य आणि 66 कांस्य पदके जिंकली आहेत.
मागील एशियन गेम्समधील भारताची कामगिरी
वर्ष सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
2010 14 17 34 65
2014 11 10 36 57
2018 16 23 31 70
2023 16 27 31 74*
टिप्पणी पोस्ट करा