ब्युरो टीम : वूमन्स टीमनंतर आता मेन्स क्रिकेट टीम इंडियाने एशियन गेम्समध्ये धमाका केला आहे. पुणेकर ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात टीम इंडियाने एशियन गेम्स क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध सुवर्ण पदक पटकावलं आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या बॅटिंगदरम्यान पावसाने खोडा घातला. त्यामुळे बराच वेळ खेळ थांबला. पाऊस थांबण्याची बरीच वेळ प्रतिक्षा करण्यात आली. मात्र पाऊस काही थांबला नाही. त्यामुळे अखेर टीम इंडियाला रँकिंगच्या जोरावर टीम इंडियाला विजेता घोषित करण्यात आलं. तर अफगाणिस्तानला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
टीम इंडियाला गोल्ड
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | गुलबदिन नायब (कॅप्टन), झुबैद अकबरी, मोहम्मद शहजाद (विकेटकीपर), नूर अली जद्रान, शाहिदुल्ला कमाल, अफसर झझाई, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, फरीद अहमद मलिक आणि झहीर खान
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन – ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, रविश्रीनिवासन साई किशोर आणि अर्शदीप सिंग.
टिप्पणी पोस्ट करा