Bhide Wada : मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात,’पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक…’ कारण

 

ब्युरो टीम :  ‘पुणे येथील भिडेवाडा संदर्भातील उच्च न्यायालयातील खटला पुणे महापालिकेने पर्यायाने राज्य सरकारने जिंकला असून सरकारच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. त्यामुळे आजचा दिवस हा पुणेकरांसाठी ऐतिहासिक असाच आहे. लवकरच भिडेवाड्यात राष्ट्रीय स्मारकाचं काम सुरू केलं जाईल,’ अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची दिली आहे. भिडे वाड्यासंदर्भातील खटल्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले आहे. 

चंद्रकांत पाटील ट्विटमध्ये म्हणतात....

पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मुलींची पहिली शाळा म्हणजे भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी पालकमंत्री या नात्याने मी सातत्याने प्रयत्नशील होतो. शासनाकडून निधीची तरतूद झाल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी भिडेवाड्यासंदर्भातील शासनाच्या भूमिकेसंदर्भात माहिती दिली होती. तसेच, उच्च न्यायालयात यासंदर्भात शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंतीही केली होती. त्यानुसार महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात शासनाची प्रभावी भूमिका मांडल्याने उच्च न्यायालयाने ही भिडेवाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने निकाल दिला आहे. लवकरच आता भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर होईल, याबद्दल सर्व पुणेकरांचे अभिनंदन.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने