Bigg Boss 17 : बिग बॉस 17 चा प्रोमो नुकताच सलमान खानने केला शूट; तोच करणार होस्ट


 ब्युरो टीम : बिग बॉस 17 तूफान चर्चेत आहे. बिग बॉस 17  बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. नुकताच आता बिग बाॅस ओटीटी 2 हे पार पडलंय. बिग बाॅस ओटीटी 2 ने मोठी धमाल केली. बिग बाॅस ओटीटी 2 (Bigg Boss Ott 2) चा विजेता एल्विश यादव हा ठरलाय. बिग बाॅस ओटीटी 2 संपल्यापासून चाहते हे सतत बिग बॉस 17 वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांची लिस्ट व्हायरल झाली. यावेळी टीव्हीचे काही फेमस चेहरे बिग बॉसच्या घरात धमाल करताना दिसतील.

गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत असलेली सीमा हैदर आणि सचिन मीना हे बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. सीमा हैदर ही आपल्या प्रेमासाठी थेट पाकिस्तानमधून नेपाळ मार्गे भारतात दाखल झालीये. सीमा हैदर सतत चर्चेत आहे. सीमा हैदर हिने स्पष्ट केले की, बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी तिच्यासोबत संपर्क साधलाय.

बिग बॉस 17 ला सलमान खान हा होस्ट करताना दिसले. सध्या सलमान खान हा त्याच्या आगामी चित्रपट टायगर 3 मध्ये व्यस्त आहे. टायगर 3 चित्रपटात सलमान खान याच्यासोबत कतरिना कैफ ही मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसले. बऱ्याच वर्षांनंतर कतरिना कैफ आणि सलमान खान यांची जोडी स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याचे चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय.

टायगर 3 चित्रपटासोबतच सलमान खान हा बिग बॉस 17 च्या तयारीला लागलाय. बिग बॉस 17 चा प्रोमो नुकताच सलमान खान याने शूट केल्याचे सांगितले जातंय. यावेळी भगव्या रंगाचा खास कुर्ता घातला असून त्यावर हाफ जॅकेट देखील सलमान खान याने घातल्याचे सांगितले जातंय. सोशल मीडियावर सलमान खान याच्या या लूकचे काही फोटो व्हायरल होताना दिसतायंत.

काही दिवसांपूर्वीच चर्चा रंगताना दिसली की, सलमान खान हा बिग बॉस 17 होस्ट करताना दिसणार नाहीये. यानंतर सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळाली. काही चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याने सलमान खान शो होस्ट करणार नसल्याचे सांगितले गेले. आता सलमान खान याने बिग बॉस 17 चा प्रोमो शूट केल्याने हे स्पष्ट आहे की, तोच बिग बॉस 17 होस्ट करताना दिसेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने