Caste census :महाराष्ट्रातील जातीय जनगणनेबद्दल दीपक केसरकर यांचं महत्त्वाच विधान

 

ब्युरो टीम : बिहारमध्ये जातीय जनगणना झाली. त्याचा रिपोर्ट समोर आलाय. आता बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यावर राज्य सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वाच विधान केलय.

इंडिया आघाडीची रॅली निघते, त्याला काही अर्थ नाहीये. अशीच रॅली अण्णा हजारेंनी पण काढली होती आणि त्यावेळी मैं भी गांधी असं त्यांनी टोपीवर लिहिलं होतं. पण नंतर काय झालं हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे नाव घ्यायचं. गांधीजीच्या नावाचा वापर करायचा आणि अशा रॅली काढायच्या याला फारसं महत्त्व आम्ही देत नाही. ते टोपी लावतायत की नाही हे आम्ही सांगू शकणार नाही, पण तरी देखील जे काही घडतंय ते योग्य नाही” अशी टीका राज्य सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

बिहारमध्ये जातीय जनगणना झाली चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकार देखील याबद्दल विचार करेल आणि हा टेक्निकल विषय आहे. त्यामुळे कायदे तज्ञ आणि महाराष्ट्र सरकार यावर योग्य तो निर्णय घेईल” असं दीपक केसरकर म्हणाले. बिहारमध्ये जातीनिहाय जनगणनेचा सर्वे रिपोर्ट समोर आलाय. बिहारच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना होणार का? अशी चर्चा सुरु झालीय. त्यावर दीपक केसरकर यांनी वरील विधान केलय.  बिहारमध्ये हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या किती?

नव्या जाती जनगणनेनुसार बिहारची लोकसंख्या 13 कोटीपेक्षा जास्त आहे. यात हिंदू समुदायाची लोकसंख्या 81.9%, मुस्लिमांची लोकसंख्या 17.7%, ख्रिश्चन 0.05%, शीख – 0.01%, बौद्ध 0.08%, जैन 0.0096% आणि अन्य धर्माची लोकसंख्या 0.12% आहे. बिहारमध्ये 13 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. यात 10.07 कोटी हिंदू, मुस्लिम लोकसंख्या 2.31 कोटी आहे. अत्यंत मागास वर्गाची लोकसंख्या 36 टक्के, मागास वर्ग 27 टक्के, अनारक्षित लोकसंख्या 15.5 टक्के, राजपूत लोकसंख्या 3 टक्के आहे. नव्या आकड्यांनुसार बिहारमध्ये एससी लोकसंख्या 19 टक्के आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने