ब्युरो टीम : देशाप्रती असलेल्या स्वाभिमानातूनच सर्वांच्या सहभागाने सुराज्य निर्माण होण्यास मदत होणार आहे. यासाठी देशासाठी काम करण्याची भावना सातत्याने मनात असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत माझी माती माझा देश या उपक्रमामध्ये अमृत कलश यात्रा कार्यक्रम नाशिकच्या कालिदास कला मंदिरात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार दिलीप बनकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ यांच्यासह सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी सरपंच, लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ भुजबळ पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत माझी माती माझा देश अभियानाच्या माध्यमातून देशाच्या मातीसाठी शहीद होणाऱ्या जवानांच्या स्मृती कायम जागरूक ठेवण्यासाठी दिल्लीत अमृत वाटीका तयार करण्यात येणार आहे. यासाठी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावातील माती असणारे हे कलश आपल्या देशभक्तीचे प्रतिक आहेत. सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या मनात देशाप्रती असणारा स्वाभिमान हा प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा