ब्युरो टीम : लवंग मसाला म्हणून वापरलं जातं. भाजीची टेस्ट वाढावी म्हणून वापरलं जातं. पण आरोग्यासाठी लवंगाचे अनेक फायदे आहेत. फक्त माऊथ फ्रेशनर किंवा दात दुखतायत म्हणूनच हे वापरलं जातं का? नाही. अनेक फायदे आहेत. हेच फायदे आपण आज जाणून घेणार आहोत.
लवंग चघळा असं सांगितलं जातं. लवंगाचे आरोग्यासाठी खूप फायदे होतात. लवंग चघळल्याने दात सुद्धा नीट राहतात. बरेचजण दाताच्या दुखण्यात लवंग दाताखाली ठेवायला प्राधान्य देतातच पण आणखी काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
लहानपणापासून आपल्याला लवंग खाण्याचा सल्ला दिला जातो. लवंग खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. पावसाळा, हिवाळा उन्हाळा ऋतू बदलला की आजार होतात. अशावेळी लवंग खायचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळायचा असेल तर लवंग खा. खाण्यापेक्षा ते चघळा.
लवंग खाल्लं की यकृताचे आरोग्य सुधारते. यकृत शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, त्याचं कार्य सुरळीत राहावं यासाठी तुम्ही लवंग चघळू शकता.
लवंगाचे तुम्ही अनेक फायदे वाचले असतील. लवंग हे एक नैसर्गिक माऊथ फ्रेशनर आहे हे आपण नेहमी ऐकलंय. तोंडाचा वास आला की आपण लवंग खातो. लवंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात तो रोज सकाळी चावून खाल्ल्यास तोंड सुद्धा साफ होईल, जंतू मरतील आणि तुम्हालाही ताजेपणा जाणवेल.
दातदुखी ही अशी समस्या आहे जी समस्या अचानक उद्भवते. रात्री अपरात्री दात दुखले की तुम्ही पेनकिलर खात असाल, पण पेनकिलर आरोग्यासाठी वाईट आहे हे सांगायची वेगळी गरज नाही. वेदना होत असतील तर तुम्ही लवंग दाताखाली ठेऊ शकता. लवंग जीवाणूंवर प्रभावीपणे हल्ला करतात ज्यामुळे दातदुखी बरी होते.
टिप्पणी पोस्ट करा