ब्युरो टीम : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीच्या सुरु असतानाच आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते गैरहजर राहिले. त्यामुळे अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चांना आणखी उधाण आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी अजित पवार यांच्या गैरहजेरीबद्दल प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते बैठकीला येऊ शकले नाहीत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पण राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात नाराजी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत. याच सगळ्या घडामोडींदरम्यान आणखी एक मोठी घडामोड घडत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्या वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालंय.
टिप्पणी पोस्ट करा